मे आणि जून महिन्यांत दोनदा प्रयत्न केल्यानंतर सुनीता विल्यम्स या ५ जून रोजी अंतराळात पोहोचल्या. परंतु, त्यांचा आता परतीचा मार्ग खडतर बनला आहे. त्या अंतराळातच अडकल्या आहेत. ५ जून रोजी त्यांनी अंतराळात झेप घेतली. नियोजनानुसार त्या २२ जून रोजी परतणार होत्या. परंतु, स्टारलाईनर स्पेसक्राक्ट या अंतराळयानात बिघाड झाल्याने त्या काही दिवसांपासून अंतराळातच अडकून पडल्या आहेत. मिंटने यांसदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली आहे. त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्यासह बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून ‘आतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’ मध्ये ५ जून रोजी (आयएसएस) पोहोचले. परंतु, आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुन्हा पृथ्वीतलावर केव्हा परतणार याबाबत नासाने कोणतीही माहिती दिलेली नाही. स्टारलाइनर या त्यांच्या यानात हीलिअम गळती झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास रखडला असल्याची चर्चा आहे. हे मिशन सुरू होण्याआधीच नासा आणि बोईंग या दोघांनाही या हीलिअम गळतीबाबत माहिती होतं. तरीही या गळतीकडे दुर्लक्ष करून ही मोहिम कार्यन्वित केली गेली. मोहीम सुरू होण्याआधीच ही गळती रोखली गेली होती, असा दावा करण्यात येतोय.

ISRO docked SpaDeX satellites space
ISRO Mission : इस्रोची आणखी एक मोहीम फत्ते, अवकाशात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
fisheries department monitor Konkan coast through drones to prevent intrusion of foreign fishing boats
कोकण किनारपट्टीतील समुद्रावर आता ड्रोनची नजर, परप्रांतिय घुसखोरी आणि एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाचा उपाय

दरम्यान, न्युजवीकच्या हवाल्याने मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, स्पेस स्टेशनमध्ये अंतराळयान सुरक्षित असून चांगली कामगिरी करत आहे, असं नासाने म्हटलं आहे. तसंच, विल्यम्स आणि विल्मोर आंतराळात अडकले नसून ते आवश्यक असेल तेव्हा नक्कीच परततील. मिशन संघांना प्रोपल्शन सिस्टम डेटाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि हीलियम गळती रोखण्याकरता वेळ देण्यासाठी ते ऑर्बिटमध्ये आहेत. अहवालानुसार, स्टारलाइनरमध्ये पुढील ४५ दिवसांचा इंधनपुरवठा आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : सुनीता विल्यम्स यांना अंतराळ स्थानकात ‘अंतराळ जिवाणू’चा धोका? पण जिवाणू अंतराळात पोहोचलाच कसा? 

“आम्ही आमचा वेळ घेत आहोत आणि आमच्या मानक मिशन मॅनेजमेंट टीम प्रक्रियेचे अनुसरण करत आहोत”, असं नासाचे कमर्शिअल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “आम्ही लहान हेलियम सिस्टम लीक आणि थ्रस्टर कार्यप्रदर्शन व्यवस्थापित करण्याच्या सापेक्ष डेटाला आमचे निर्णय घेऊ देत आहोत.”

सुनीता विल्यम्स यांचा अल्पपरिचय

सुनीता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतरळवीर म्हणून निवड झाली. त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदाबादमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९६५ मध्ये झाला. यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लढाऊ विमानंही उडवली आहेत. त्यांनी ३० प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव आहे. सुनीता विल्यम्स यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केलं. मायकेल हे टेक्सासमध्ये पोलीस अधिकारी होते. सुनीता विल्यम्स यांनी २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे. त्यामुळे यंदा त्या तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत.

Story img Loader