नासा व बोइंग कंपनी यांच्यात मंगळावर अंतराळयान  पाठवण्यासाठी अधिक शक्तिशाली असा अग्निबाण तयार करण्याबाबत २.८ अब्ज डॉलरचा करार झाला आहे. जगातील आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली असा हा अग्निबाण असणार असून तो मंगळावर माणसाला पाठवण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
   बोइंग व नासा यांच्यातील करारास अंतिम रूप देण्यात आले असून या अग्निबाणाचे नाव ‘स्पेस लाँच सिस्टीम’ म्हणजे एसएलएस असणार आहे.
   नासा व बोइंग यांची पथके या अग्निबाणाचा अंतिम आढावा घेतील व मगच त्याचे पूर्णस्वरूपी उत्पादन सुरू होईल, बोइंग एसएलएस प्रकल्पाच्या उपाध्यक्ष व्हर्जिनिया बार्नेस यांनी सांगितले, की अतिशय शक्तिशाली असा हा अग्निबाण तयार करण्यास आम्ही सज्ज आहोत. अवकाशात खोलवर जाऊन शोध घेण्याच्या या नासाच्या मोहिमेबाबत आम्हीही उत्सुक आहोत. या अग्निबाणाच्या क्रायोजेनिक टप्प्यांचे डिझाइन (संरचना) तयार करण्यात आली असून त्यात द्रव हायड्रोजन व ऑक्सिजन वापरला जाणार आहे.  
   १९६१ मध्ये सॅटर्न ५ या अग्निबाणाची संरचना केल्यानंतर त्याची अंतिम तपासणी करून मगच ते यान चंद्राच्या दिशेने मानवाला घेऊन गेले होते.
  मंगळाकडे जाणाऱ्या नव्या अग्निबाणाची पहिली चाचणी २०१७ मध्ये होणार असून एसएलएस हा अग्निबाण अवकाशवीरांच्या गरजा पूर्ण करणार असेल. तो ७७ टन वजन वाहून नेऊ शकेल.