मंगळाच्या पृष्ठभागावर सध्या फुलांचे ताटवे फुलल्याचे चित्र आहे.. यावरून कोणीही असा तर्क काढेल की मंगळावरी जीवसृष्टी आहे.. मात्र, थांबा तसे नाही. मंगळाच्या पृष्ठभागावर फुलांचे ताटवे फुलल्याचे छायाचित्र नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हर या यंत्रमानवाने काढले आहेत. मात्र, ते फुलांचे ताटवे नसून मंगळाच्या लाल मातीच्या पृष्ठभागावरील खडकांवर साकारलेले धुलीकण आहेत.
मंगळावरील विशिष्ट वातावरणामुळे तेथील धुलीकणांचे संच खडकांवर जमा होऊन त्यांचे स्फटिकांमध्ये रुपांतर झाले आहे. त्यामुळे अंतराळातून चमकणारे हे पांढरेशुभ्र स्फटिकं फुलांच्या ताटव्यांसारखे भासतात. मात्र, नेटकरांमध्ये मंगळावर फुले फुलली असून त्यामुळे तेथे जीवसृष्टी असल्याचा संभव आहे या चर्चेने जोर धरला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरात अशाच प्रकारची चर्चा सुरू झाली होती. मंगळावर प्लास्टिकचा एक तुकडा आढळून आला होता व तो चमकल्यामुळे चर्चेला तोंड फुटले होते. मात्र, हा तुकडा रोव्हरचाच असल्याचे नंतर सिद्ध झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa gifts unseen space photos to earth on new year