आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पूरक कार्य करण्यासाठी आणि हबल दुर्बिणीद्वारे अधिक छायाचित्रे मिळवून देण्यासाठी नासाने गुरुवारी मानवरहित दळणवळण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. माहिती गोळा करण्यासाठी तसेच शोध घेण्यासाठी नासाच्या नियोजित कार्यक्रमामध्ये उपग्रह श्रेणीतील पुढील पिढीच्या दळणवळण उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे. त्यातील पहिला उपग्रह ‘टीडीआरएस- के’ गुरुवारी फ्लोरिडा येथील नासाच्या प्रक्षेपण केंद्रावरून सोडण्यात आला.
टीडीआरएस-के हा दळणवळण उपग्रह अंतराळ संशोधनाच्या कामांना पूरक ठरणार असून, अंतराळ स्थानकातील यंत्रणेचा विस्तार करण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याचे, नासाचे अधिकारी बद्री युनेस यांनी सांगितले. टीडीआरएस-के पृथ्वीवरील ठिकाणांचे उपग्रहीय शोधन करण्यासाठी (ट्रॅकिंग), माहिती नोंदविण्यासाठी, तसेच इतर अंतराळ संशोधनाच्या कामात मदत करणार आहे.
नासाचा नवा दळणवळण उपग्रह प्रक्षेपित
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पूरक कार्य करण्यासाठी आणि हबल दुर्बिणीद्वारे अधिक छायाचित्रे मिळवून देण्यासाठी नासाने गुरुवारी मानवरहित दळणवळण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. माहिती गोळा करण्यासाठी तसेच शोध घेण्यासाठी नासाच्या नियोजित कार्यक्रमामध्ये उपग्रह श्रेणीतील पुढील पिढीच्या दळणवळण उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे.
आणखी वाचा
First published on: 01-02-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa launches communication satellite