NASA On 2024 YR4 Hitting Earth : नासाने नुकतेच एका अ‍ॅस्ट्रोइडबद्दल चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये एक अॅस्ट्रोइड (Asteroid) शोधण्यात आला होता, ज्याला २०२४ वायआर४ (2024 YR4) नाव देण्यात आले.आता या 2024 YR4 बद्दल अधिकची माहिती समोर आल्याने शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. हा अ‍ॅस्ट्रोइड हा २०३२ साली पृथ्वीवर अदळण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञ सध्या याच्या मार्गाकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. अंतराळाच्या तुलनेत हा अ‍ॅस्ट्रोइड खूपच लहान असला तरी तो पृथ्वीवर येऊन अदळल्यास मोठा विनाश घडवून आणण्याची क्षमता यामध्ये आहे. या अ‍ॅस्ट्रोइड बद्दल आवश्यक अशी सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा अ‍ॅस्ट्रोइड 2024 YR पहिल्यांदा अल सॉस या चिली येथील वेधशाळेने शोधला होता. याचा आकार १३० ते ३०० फूटांच्या दरम्यान आहे. अंतराळातील इतर घटकांशी तुलना केल्यानंतर हा फारसा धोकादायक वाटणार नाही. पण त्याची गती आणि धडकेच्या शक्यतेमुळे हा सर्वात जवळून पाहीला जाणारा अ‍ॅस्ट्रोइड ठरला आहे.

प्रथ्वीला धडक बसण्याची शक्यता किती आहे?

नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA)चा अंदाज आहे की, २२ डिसेंबर २०३२ रोजी हा लघुग्रहाची पृथ्वीवर अदळण्याची शक्यता ३.१ टक्के इतकी आहे, तर युरोपियन अंतराळ संस्था (ESA) ने ही शक्यता थोडी कमी म्हणजेच २.८ टक्के इतकी असल्याचे सांगितले आहे.

जर हा 2024 YR4ने पृथ्वीला धडक दिलीच तर याचे परिणाम अत्यंत गंभीर स्वरुपाचे असू शकतात. हा लघुग्रह जरी खूप मोठा नसला तरी त्याचा वेग हा जवळपास ४०,००० मैल प्रति तास इतका प्रचंड आहे. म्हणजेच यामधून आठ मेगाटन टिएनटी इतकी ऊर्जा बाहेर टाकली जाईल. ही ऊर्जा हिरोशिमा येथे स्फोट झालेल्या बॉम्बपेक्षा ५०० पट जास्त शक्तिशाली असणार आहे. अशा स्फोटाने संपूर्ण शहर बेचिराख होऊ शकते. इतकंच नाही थर यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस आणि जीवितहानी होऊ शकते.

प्रथ्वीकडे वेगाने येत असलेल्या या 2024 YR4मुळे शास्त्रज्ञ चिंतेत असले तरी, त्यांनी अद्याप कोणतीही धोक्याची सूचना दिलेली नाही. नासा आणि ईएसए या दोन्हीही संस्था 2024 YR4 चा मागोवा घेत त्याच्याबद्दलचा अधिक डेटा गोळा करण्यासाठी आणि धडक बसण्याची शक्यता किती आहे याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

ईएसएच्या प्लॅनेटरी डिफेन्स ब्युरोचे प्रमुख प्रमुख रिचर्ड मोइसल (Richard Moissl) निदर्शनास आणून दिले की, “आज तरी हे संकट ठरत नाही. हे काही डायनासॉर किलर किंवा ग्रहाचा विनाश करणारे नाही. जास्तीत जास्त शहराच्या एका भागासाठी धोका ठरू शकते.” म्हणजेच यामुळे एखाद्या भागात यामुळे मोठे नुकसान होऊ शकतो पण या धडकेमुळे संपूर्ण मानवता नष्ट होईल अशी कुठलीही शक्यता नाही.

धोकी किती आहे?

आनंदाची बाब ही आहे की शास्त्रज्ञांकडे 2024 YR4 च्या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी अजूनही बराच वेळ आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप मार्च २०२५ मध्ये त्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात करेल, ज्यामुळे तो कशापासून बनलेला आहे आणि तो कोणत्या दिशेला जात आहे याबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल.

धडक कोणत्या भागांना बसू शकते?

समजा हा 2024 YR4 पृथ्वीवर आदळला तर त्याचा परिणाम जगातील कोणत्या भागांना होऊ शकतो याबद्दल नासाने माहिती दिली आहे. यामध्ये पूर्व पॅसिफिक, उत्तर दक्षिण अमेरिका, अटलांटिक, आफ्रिकेचा काही भाग, अरबी समुद्र आणि दक्षिण आशिया यांचा समावेश आहे. मुंबई, कोलकाता, ढाका, बोगोटा आणि लागोस सारखी प्रमुख शहरे या घोक्याची शक्यता असलेल्या भागात येतात, ज्यामुळे ११० दशलक्षाहून अधिक लोकांना संभाव्य धोका निर्माण होतो. धडकेची शक्यता कमी असली तरी, धडक झाल्यास या भागातील दाट लोकसंख्येमुळे भीषण नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो.

आपण तयार आहोत का?

अंतराळ संस्था केवळ 2024 YR4 च्या मार्गाची माहिती घेत नाहीत, तर त्यांच्याकडून कोणत्याही संभाव्य परिणामांसाठीची तयारी देखील सुरू आहे