नासाच्या ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर अवकाशयानाद्वारे शोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासाच्या ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर (एलआरओ) या अवकाशयानाच्या मदतीने वैज्ञानिकांनी चंद्रावर प्रकाशित भागात पाण्याचे रेणू शोधले आहेत. आगामी चांद्र मोहिमांसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर या अवकाशयानावर लावलेल्या लायमन अल्फा मॅपिंग प्रोजेक्ट या उपकरणाने चंद्रावरील पृष्ठभागावरील पाण्याच्या कणांचा थर टिपला असून तेथे दिवसाही पाण्याचे अस्तित्व आहे असा त्याचा अर्थ असल्याचे ‘जिओफिजिकल रीसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

गेल्या दशकापर्यंत वैज्ञानिक असे गृहीत धरून चालले होते,की चंद्र हा कोरडा आहे व तेथील पाणी प्रकाश असलेल्या भागात नसून अंधाऱ्या भागातील विवरात विशेष करून तेथील ध्रुवीय  प्रदेशात आहे. मात्र, अलीकडेच नासाच्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे प्रकाश आहे तेथे पाण्याचे थर शोधून काढले आहेत.

पाण्याचे हे रेणू तेथील मातीला चिकटलेले दिसून आले. चंद्रावरचा हा भाग जसा तापत जातो तसे हे पाणी वरच्या भागातून  खाली येते. चंद्रावरील जलचक्राचे आकलन त्यातून शक्य झाले असून आगामी मोहिमात मानवासाठी तेथील पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो, असे प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिटय़ूट या संस्थेचे वैज्ञानिक अमंदा हेंड्रिक्स यांनी म्हटले आहे.

चंद्रावरील पाणी हे इंधन तयार करण्यासाठी किंवा प्रारणांपासून बचाव करताना औष्णिक व्यवस्थापनासाठीही वापरले जाऊ शकले. पृथ्वीवरून चंद्रावर अनेक घटक पाठवावे लागतात, त्यांची संख्या यामुळ कमी होऊ शकते. त्यामुळे आगामी चांद्र मोहिमा किफायतशीर होतील असे हेंड्रिक्स यांचे म्हणणे आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर जे पाण्याचे रेणू सापडले ते चंद्रावरील प्रखर दुपारी टिकून होते, उष्णता वाढल्यानंतर पाण्याचे हे रेणू थंड भागाक डे मार्गक्रमण करतात. काही वेळा पाण्याचे हे रेणू तेथील वातावरणात जातात. नंतर ते पृष्ठभागावर परत येतात. अपोलो मोहिमांमधून चंद्रावरील जे  पाण्याचे व इतर नमुने आणले होते त्याचा अभ्यास साउथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट या टेक्सासमधील संस्थेचे मायकेल पोस्टन यांनी केला असून तेथील पाणी पृष्ठभागाला कसे चिकटून राहते याचा उलगडा त्यातून झाला आहे.

चंद्राचे जलचक्र

कक्षीय निरीक्षणातून चंद्राचे जलचक्र समजून घेणे कठीण आहे, कारण त्यांच चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या आधारे अंदाज बांधले जातात. पाण्याचे रेणू सतत इकडून तिकडे उडय़ा मारत राहतात. त्यामुळे  आताचे संशोधन त्यातील भौतिक व रासायनिक प्रक्रिया उलगडणारे आहे, असे हेंड्रिक्स यांचे म्हणणे आहे. चंद्रावरील पाण्याचा मुख्य स्त्रोत हा सौरवातामधील हायड्रोजन आयन हा असावा. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या मागे जातो तेव्हा सौर वारे रोखले जातात, त्यामुळे जलचक्र खुंटले जाते. असे मानले जाते तरी तसे होत नाही, चंद्रावर पाण्याचे रेणू कमी होत नाहीत.