सोशल साइट्सवरून भारताचे खोटे नकाशे पसरवण्याच्या घटना उघडकीस येत असतानाच अमेरिकेची राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था नासाने दिवाळीच्या रात्री उपग्रहाद्वारे घेतलेला भारताच्या सीमारेषा स्पष्ट दर्शवणारा कृष्णधवल नकाशा गुरुवारी प्रसिद्ध केला.
१२ नोव्हेंबर २०१२ रोजी नासाच्या उपग्रहावर बसवलेल्या व्हिजिबल इन्फ्रारेड इमॅिजग रेडिओमीटर सूटद्वारे दक्षिण आशियाची छायाचित्रे घेतली गेली. यामध्ये भारताच्या सीमारेषा दर्शवणारी कृष्णधवल छायाचित्रे दिवाळीच्या रात्री घेतल्याचे नासाने स्पष्ट केले. प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशामध्ये चमकदार दिसणारे भाग हे भारतातील शहरे आणि मनुष्यवस्तीची ठिकाणे आहेत. पृथ्वीतलावर चीनपाठोपाठ जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत हा देश आहे. मोठय़ा लोकवस्तीचा प्रदेश प्रकाशमान दिसत असून भारताच्या सीमेलगत असलेले बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान यांच्याही सीमारेषा नकाशात दिसत असल्याचे नासाने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांत विविध सोशल साइट्सवर दिवाळीचा झगमगाट दर्शवणारे छायाचित्र प्रकाशित केले जात होते. मात्र त्याबाबत अधिक काही स्पष्ट होत नव्हते. अमेरिकी संरक्षण विभागाच्या हवामानविषयक कार्यक्रमांतर्गत ख्रिस एल्विज या वैज्ञानिकाने उपग्रहाद्वारे सन २००३ मध्ये घेतलेल्या छायाचित्रापैकी एक होते. जगातील लोकसंख्यावाढीबाबतचा अभ्यास करण्यासाठी उपग्रहाद्वारे ही छायाचित्रे काढली होती, असे नासाने स्पष्ट केले.
या छायाचित्रांमध्ये पांढऱ्या रंगाचा भाग शहरातील प्रकाश दर्शवत असून तो १९९२ च्या पूर्वीचा आहे. तर निळा, हिरवा आणि लाल रंग अनुक्रमे सन १९९२, १९९८ आणि २००३ दर्शवीत असल्याचे नासाने स्पष्ट केले. मात्र दिवाळीच्या काळातील अतिरिक्त प्रकाश अवकाशातूनही उठून दिसतो, असे नासाने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा