SpaceX Crew Dragon Capsule : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे जवळपास तीन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. या दोघांची पृथ्वीवर येण्याची वाट नासासह संपूर्ण जग पाहत आहे. त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन अंतराळ स्थानकात गेलेलं बोईंगचं स्टारलाइनर हे काही दिवसांपूर्वी त्या दोघांशिवाय पृथ्वीवर परतलं. आता एक चांगली बातमी समोर आली असून सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल’ अंतराळ स्थानकावर पोहोचलं आहे. त्यामुळे ‘स्पेसएक्सच्या क्रू-९ मिशन कॅप्सूल’च्या माध्यमातून सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे लवकरच पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : लेबनॉनमधील हेजबोलानंतर इस्रायलचा हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला; येमेनमधील होदेदाह बंदराला केलं लक्ष्य!
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ५ जून रोजी ८ दिवसांसाठी अंतराळात गेले होते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या स्टारलाइनर यानाला काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक समस्यांमुळे बोइंगचे स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर परतलं. त्यामुळे ८ दिवसांसाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळवीर आता जवळपास तीन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. मात्र, आता त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Welcome, #Crew9! After floating through the Dragon’s hatch, our new arrivals join the crew aboard the @Space_Station. They’ll spend five months conducting @ISS_Research and maintenance on the orbiting lab. pic.twitter.com/DJX7f9vxlg
— NASA (@NASA) September 29, 2024
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवर परतीचा मार्ग मोकळा झाला असून ‘स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलम’ अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे. नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमध्ये प्रवास करत रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) यशस्वीरित्या पोहोचले आहेत. निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांचे आयएसएसवर आगमन झाल्यावर त्यांचे सर्वांनी उत्साहात स्वागत केले आहे.
दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या वर्षी जूनमध्ये अंतराळात गेले होते. तेव्हापासून तो तिथेच अंतराळातच अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी, क्रू-९ मिशन सुरुवातीला २६ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र, वादळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हवामान खूपच खराब झाले होते. त्यामुळे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. नंतर २८ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आले होते.
‘हे’ दोन अंतराळवीर करणार मदत
अलेक्झांडर गोर्बुनोव्ह
रोस्कोमोसमध्ये कॉम्सोनट असलेले अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेसुद्धा स्पेस एक्स क्रू ९ मोहिमेत समाविष्ट आहेत. मूळचे रशियाचे असलेले गोर्बुनोव्ह यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं असून स्पेसक्राफ्ट आणि अप्पर स्टेजेसमध्ये प्राविण्य मिळवलं आहे. २०१८ मध्ये कॉस्मोनट म्हणून नियुक्त होण्याआधी ते रॉकेट स्पेस कॉर्प. एनिर्जिया येथे अभियांत्रिक होते. अलेक्झांडर यांची ही पहिलीच स्पेसफ्लाइट असली तरीही अभियांत्रिकीतील प्राविण्य आणि प्रशिक्षणामुळे ते ही मोहिम यशस्वी करण्यास सज्ज आहेत.
निक हेग
निक हेग यांना अमेरिकेतली स्पेस फोर्समध्ये सक्रिय कर्नल स्पेस एक्स क्रू ९ मोहिमेचा अनुभव आहे. कॅन्सन येथील बेलेविले येथे जन्मलेले हेग यांनी अंतराळ इंजिनिअरिंग केलं आहे. २०१३ मध्ये नासामध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी युएस एअर फोर्समध्ये विविध पदांवर काम केलंय. हेग यांची आयएसएची ही दुसरी आणि एकूण तिसरे अंतराळ उड्डाण असेल. यापूर्वीच्या मोहिमांमध्ये म्हणजेच २०१८ मध्ये सोयुझच्या प्रक्षेपण दरम्यान एक नाट्यमयपणे उड्डाणादरम्यान त्यांनी आयएसएस वर सहा महिन्यांचा यशस्वी मुक्काम केला आहे. आयएसएसवर असताना त्यांनी तीन स्पेसवॉक केले आहेत. हेग या मोहिमेचे नेतृत्व करणार आहे.