नासा म्हणजे नॅशनल अ‍ॅरोनॅटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही संस्था पुढील महिन्यात चंद्रावर छोटय़ा मोटारीच्या आकाराचे यांत्रिक शोधयान पाठवणार असून, त्याचा उद्देश चंद्रावरील वातावरणाची अधिक माहिती मिळवणे हा आहे. चंद्राच्या वातावरणाच्या तुलनेने पातळ थराची रचना व त्याचे घटक यांचे नेमके चित्र त्यामुळे उलगडणार आहे. येत्या ६ सप्टेंबरला हे यान नासाच्या व्हर्जिनिया स्पेस कोस्ट येथील तळावरून सोडले जाणार आहे. तेथून पृथ्वीच्या कक्षेबाहेर होणारे हे पहिलेच उड्डाण आहे.
नासाने म्हटले आहे, की ल्युनर अ‍ॅटमॉस्फिअर अँड डस्ट एनव्हायर्नमेंट एक्स्प्लोअरर (लाडी) असे या यानाचे नाव असून, चंद्राचे हवामान व तेथील आकाशात उडणारी धूळ याविषयी अधिक माहिती त्याच्या निरीक्षणातून मिळणार आहे.
चंद्राच्या या संशोधनातून मोठे लघुग्रह, बुध व इतर बाहय़ग्रहांचे चंद्र यांच्याविषयी माहिती उपलब्ध होईल.
चंद्रावरील विरळ वातावरणासारखे वातावरण सौरमालेत इतर ग्रह किंवा उपग्रहांवर असण्याची शक्यता नेहमीच जास्त आहे त्यामुळे त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर आपल्या सौरमालेची उत्क्रांती व त्यातील घटकांवर यामुळे नवीन प्रकाश पडेल, असे नासाचे सहायक प्रशासक जॉन ग्रन्सफेल्ड यांनी सांगितले. या मोहिमेची वैशिष्टय़े म्हणजे मिनोटॉर-५ अग्निबाणाची पहिलीच चाचणी या मोहिमेत होत आहे त्याचबरोबर व्हर्जिनिया स्पेस कोस्ट येथून पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडले जाणारे हे पहिलेच यान आहे.उड्डाणानंतर ‘लाडी’ यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल व नंतर ४० दिवसांच्या कालावधीनंतर ते माहिती पाठवण्यास सुरुवात करील. सुरुवातीचे तीस दिवस या यानावरील यंत्रसामग्री व्यवस्थित सुरू होण्यास लागतील. त्यात उच्च शक्ती लेसर दळणवळण प्रणाली असून तिची क्षमता पृथ्वीवरील फायबर ऑप्टिक प्रणालीइतकी आहे.
कसे आहे  ‘लाडी’ चांद्रयान
‘लाडी’ यानाचा आकार बससारखा आहे. ते वजनाने हलक्या असलेल्या कार्बन संमिश्राचे बनवलेले आहे. त्याचे वस्तुमान ५४७.२ पौंड ते ८४४.४ पौंड दरम्यान राहील. बससारख्या आकाराची असे यान यापुढे इतरही ठिकाणी पाठवता येतील. अतिशय कमी खर्चात बनवलेले, पण उत्तम दर्जाचे असे हे चांद्रयान आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Story img Loader