करोनाची दुसरी लाट आता मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहीमचा वेग आणखी वाढवण्याची गरज आहे.करोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक स्वदेशी लस विकसित होत आहे. भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारत बायोटेकेने विकसित केलेल्या नाकातून देण्यात येणाऱ्या लसीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे. लस निर्मितीत बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि त्याच्या पीएसयू बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी)ने मदत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या लसीचं नाव बीबीव्ही१५४ असं आहे. ही इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या मदतीने लसीकरण आणखीन सोप्प्या पद्धतीने करता येणार आहे. या लसीमुळे लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया यांचा खर्च वाचवणार आहे.

नाकावाटे विषाणू करतो शरीरात प्रवेश

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात. करोनाचा विषाणू फुफ्फुसांना सर्वाधिक धोका पोहचवतो.

“जागतिक मीडियानं भारताचं हे यशही दाखवावं”, आनंद महिंद्रांनी ट्विटरवर सुनावलं!

सध्या देण्यात येणाऱ्या लसींमध्ये आणि नेजल व्हॅक्सिनमध्ये काय फरक?

सध्या भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’, रशियाची स्पुटनिक व्ही लस दिली जात आहे. मात्र या लसी इंटरामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. त्यापेक्षा ही नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा केला जातोय. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखीन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. तसेच सध्या देण्यात येणाऱ्या सर्व लसी या दोन डोसच्या असल्या तरी ही नेजल व्हॅक्सिन एका डोसची असणार आहे. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीचे दुष्परिणाम कमी असणार आहेत.

करोनाची तिसरी लाट?, बंगळुरूत गेल्या ११ दिवसात ५४३ लहान मुलांना करोनाची लागण

मुलांसाठी महत्वाची का?

सध्या मुलांना तोंडावाटे देण्यात येणाऱ्या पोलिओच्या लसींप्रमाणेच ही नेजल व्हॅक्सिन देता येणार आहे. नाकामध्ये लसीचे काही थेंब टाकून हे लसीकरण अधिक वेगाने, दारोदारी जाऊन, स्वस्तात करणं शक्य होणार आहे. अर्थात या लसींसाठी पोलिओच्या लसींप्रमाणेच थंड तापमान, काळजीपूर्वक हाताळणी या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. पण यासाठी येणारा खर्च आणि या लसी देण्यात असणारी फ्लेक्झिबिलीटी ही सध्याच्या व्यवस्थेपेक्षा अधिक आहे. याचमुळे कमी वेळात अधिक अधिक लोकांपर्यंत आणि खास करुन लहान मुलांचे लसीकरण या लसींच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे. या लसी सध्याच्या लसींपेक्षा अधिक स्वस्त, परिणामकारक आणि हाताळण्यास सोप्प्या असतील असं सांगितलं जात आहे. ग्रामीण भागांमध्ये सुई टोचून घेण्याची असणारी भीतीचा प्रश्न सुद्धा ही लस घेताना निर्माण होणार नाही.