पाटणातल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आता पंजाबमध्येही अशाच प्रकारच्या घातपाताची शक्यता आहे. याबाबतची माहिती गुप्तचर खात्याने पंजाब पोलिसांना कळविली आहे.
गुप्तचर खात्याच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सीमेवरून काही शिख कट्टरपंथिय स्फोटकांसह घुसखोरी करण्याच्या तयारीत असून प्रचारसभेत घातपातासाठी स्फोटकांचा वापर केला जाऊ शकतो. पाकिस्तानातून काही जणांना मोठ्या प्रमाणावर स्फोटकांसह पाठविण्याची तयारी असल्याचे गुप्तचर खात्याने म्हणले आहे. या आधी पाटणा, बिहार येथे २७ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी साखळी स्फोट झाले होते. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या पंजाब मधील प्रचारसभेत घातपात होण्याची शक्यता गुप्तचर खात्याला मिळाली आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी देशभर प्रचार करत आहेत.
नरेंद्र मोदींच्या सभेत प्राणघातक हल्ल्याची शक्यता
पाटणातल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आता पंजाबमध्येही अशाच प्रकारच्या घातपाताची शक्यता आहे.

First published on: 04-11-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nat del shikh extremist may attack narendra modi