Natalie Winters Dress Controversy : नताली विंटर्स (Natalie Winters) ही २३ वर्षीय अमेरिकन पत्रकार तिच्या पोशाखामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. व्हाईट हाऊस प्रतिनिधी म्हणून कामाच्या पहिल्याच दिवशी नताली विंटर्सला टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान कपड्यांवरून लोकांनी तिला सुनावल्यानंतर नतालीने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नताली विंटर्स यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रोलर्स आणि पत्रकारांविरोधात संताप व्यक्त केला आहे. यूशिकागोमधून (UChicago) तीन वर्षात पदवीचे शिक्षण पूर्ण करताना मी मुख्य प्रवाहातील बहुतांश वार्ताहरांपेक्षा अधिक बातम्या ब्रेक केल्याचं ती म्हणाली आहे.

“माफ करा? काही द्वेष करणारे वेडे टिप्पणी करतात की त्यांना माझे स्वेटर आवडले नाही आणि ही एक बातमी बनते? ही मीन गर्ल एनर्जी काहीतरी वेगळीच आहे आणि तुम्ही माझं मतही विचारत नाहीत”, असं म्हणत स्टीव्ह बॅननच्या वॉर रूम या शोची को-होस्ट असलेल्या नतालीने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली आहे.

“मी शेवटचं तपासलं त्यानुसार, वयाच्या २३ व्या वर्षी मी मुख्य प्रवाहातील बहुतांश पत्रकारांपेक्षा जास्त स्टोरीज ब्रेक केल्या आहेत (ज्या तुम्ही सर्वांनी चुकीची माहिती म्हणून सेन्सॉर करण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न केला होता) तेही तीन वर्षांत UChicago मधून पदवी घेत असताना”, असंही ती पुढे म्हणाली आहे.

नेमका वाद काय आहे?

व्हाइट हाऊस करस्पॉडंट म्हणून कामाच्या पहिल्या दिवशी विंटर्स तिच्या त्या दिवशीचा पोशाख दाखवत काही फोटो पोस्ट केले होते. तिने त्या दिवशी काळ्या रंगाचा टॉप, एक पांढरा कॉलरचा शर्ट आणि पांढरे स्कर्ट परिधान केले होते. याबरोबरच तिने पांढरे सॉक्स आणि त्याच रंगाचे स्निकर्स परिधान केले होते. या पोस्टनंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. तिचे कपडे खूपच अनौपचारिक असल्याचे काही जणांचे म्हणणे होते. काही जणांनी तिला औपचारिक कपडे घालण्याचा सल्ला देखील दिला. दरम्यान वाद पेटल्यावर अनेकांनी नतालीचे समर्थन देखील केले. अनेकांनी तिच्या टीकेला उत्तरे देण्यास सुरूवात केली, तसेच द्वेष करणार्‍यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.

डेलीमेलने दिल्या वृत्तानुसार २३ वर्षीय नताली काही दिवसांपूर्वीच उघडपणे आपण ट्रान्सफोबिक असल्याचे जाहीर केले आहे. तिने ट्रान्सजेंडर समुदायाविरुद्ध एक्सवर अनेक पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.

Story img Loader