श्रीलंका सरकारने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून एका भारतीय नागरिकाचे नाव बुधवारी वगळण्यात आले. ‘लिबरेशन ऑफ तामिळ टायगर इलम’ (लिट्टे)च्या हिंसाचारी कारवायांना समर्थन करीत असल्याच्या आरोपावरून दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. आवश्यक स्पष्टीकरणानंतर काही लोकांना यादीतून वगळण्यासाठी परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर रुवान वानिंगासुरिया यांनी दिली. चौकशीनंतरच दहशतवादी यादीतून काहींना वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
‘पेण अर्बन’ला राष्ट्रीयकृत बँकेत विलिन करा’
नवी दिल्ली: सुमारे सातशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार असलेल्या पेण अर्बन बँकेचे राष्ट्रीय बँकेत विलिनिकरण करण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे पेण अर्बन ठेवीदार खातेदार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
रिझर्व बँकेने पेण अर्बनचे लिक्विडेशन करू नये, तसेच बँकेचा परवाना परत करण्यासाठी आरबीआयला निर्देश देण्याची विनंती जेटली यांना केली आहे. केंद्रीय अवज़्ाड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या नेतृत्वाखाली खा. किरिट सोमय्या, श्रीरंग बालणे, गोपाळ शेट्टी यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
रॉबिन विल्यम्सने मनगटाची शीर कापली
लॉस एंजेलीस : प्रख्यात हॉलीवूड अभिनेते रॉबिन विल्यम्स यांनी स्वत:ला गळफास लावून घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या हाताची शीर कापल्याची माहिती पुढे आली आहे. ११ ऑगस्ट रोजी विल्यम्स यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला होता. याविषयी अधिक माहिती मरिन परगण्याचे नगरपाल लेफ्टनंट कीथ बॉइड यांनी दिली. अभिनेते विल्यम्स यांच्या डाव्या मनगटावर अनेक वार आढळले असून घटनास्थळी छोटीशी सुरीही सापडली असल्याचे कीथ म्हणाले.