नोबेल विजेती पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिला फिलाडेल्फिया येथे सन्मानित केले जाणार आहे, असे लिबर्टी मेडल समारंभाच्या आयोजकांनी म्हटले आहे. पण त्यांनी तिची निवड केली तेव्हा तिला नोबेल मिळेल अशी त्यांना कल्पना नव्हती. नॅशनल कॉन्स्टिटय़ूशन सेंटरचे अध्यक्ष जेब बुश यांनी सांगितले की, मलालाने समानता व शिक्षणहक्कासाठी लढा दिला व वयाची पर्वा न करता तिने सुधारणेची ज्योत तेवत ठेवली. मलाला हिच्यावर तालिबान्यांनी २०१२ मध्ये गोळीबार केला होता तेव्हा ती शाळेतून परत जात होती. तिला देण्यात येणारा लिबर्टी पुरस्कार १ लाख अमेरिकी डॉलरचा असून तो तिला प्रदान केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्लीत डेंग्यूची वाढ
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एका आठवडय़ात ४२ टक्के वाढली असून एकूण रुग्ण संख्या २२५ झाली आहे. ११ ऑक्टोबरला ही संख्या १५८ होती ती १८ ऑक्टोबरला २२५ झाली असे दक्षिण दिल्ली महापालिकेने म्हटले आहे. उत्तर दिल्ली ४४, दक्षिण दिल्ली-९०, पूर्व दिल्ली ३४ या प्रमाणे रुग्णांची संख्या आहे. श्रीगंगाराम रुग्णालयात एका मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. गेल्या वर्षी डेंग्यूचे ५५०० रुग्ण होते व त्यातील सहा मरण पावले. तुलनेने या वर्षी डेंग्यूचे प्रमाण कमी आहे कारण पाऊस विलंबाने पडला असून त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक योजना करण्यात आल्या होत्या.

बांगलादेशातील  अपघातात २५ ठार
ढाका-वायव्य बांगलदेशात दोन प्रवासी गाडय़ांची टक्कर होऊन २५ ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढाका-राजशाही महामार्गावर नाटोर जिल्हा येथे दोन बसगाडय़ांची टक्कर  झाली त्यात २२ जण जागीच ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. नाटोरचे पोलिस अधीक्षक वासुदेव बनिक यांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेनंतर अनेक सेवाभावी संस्था आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. त्यामुळे मदतकार्य सुरळीत पार पडले.

जागतिक आयुर्वेद परिषद ६ ते ९  नोव्हेंबरदरम्यान
नवी दिल्ली : नवी दिल्लीत ६ ते ९ नोव्हेंबर रोजी ‘जागतिक आयुर्वेद परिषद’ आयोजित करण्यात आली असून, जगभरातील ४००० तज्ज्ञांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विविध देशांचे आरोग्यमंत्री, भारतातील सर्वच राज्यांचे आरोग्यमंत्री या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘‘आयुर्वेदला जागतिक वैद्यकीय क्षेत्रात गौरवशाली स्थान मिळवून देण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आयुर्वेदासाठी विशेष नियामक मंडळ तयार करणार आहे,’’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. या परिषदेत आयुर्वेदासंबंधी विविध विषयांवर चर्चाक्षेत्रे, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, माहितीपटही दाखविण्यात येणार आहे.

फ्लिपकार्टची चौकशी नाही- निर्मला सीतारामन
बंगळुरू : फ्लिपकार्ट या ई व्यापार कंपनीने बिग बिलियन डे विक्री दिन साध्य करताना व्यापारी निकष व वस्तूंच्या किमतींबाबतचे नियम यांची पायमल्ली झाल्याच्या प्रकाराची चौकशी केली जाणार नाही, असे व्यापार व उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.भाजप कार्यालयात त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, ई किरकोळ विक्रेती कंपनी असलेल्या फ्लिपकार्टची चौकशी केली जाणार नाही. फ्लिपकार्टने बिग बिलियन डेच्यावेळी वस्तूंची मोठी विक्री केली होती.  सीतारामन यांनी ८ ऑक्टोबरला नवी दिल्ली येथे असे जाहीर केले होते की, फ्लिपकार्टने अत्यंत कमी दरात वस्तू विकल्याने व्यापारी नियमांचे उल्लंघन करून मोठय़ा प्रमाणावर सूट दिल्याच्या आरोपाची चौकशी केली जाईल.  मात्र आपल्या आधीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. माझी तीन वाक्ये फार वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावून सांगण्यात आली, असा दावा सीतारामन् यांनी मंगळवारी बोलताना केला.

बुद्धांचा २०० फूट पुतळा
लखनौ-  कुशीनगर जिल्ह्य़ात भगवान गौतम बुद्धांचा २०० फुटी भव्य पुतळा उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एका कराराची पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भगवान गौतम बुद्धांचा पुतळा ब्राँझचा राहील. तो पाचशे फुटांचा असणार होता, पण तांत्रिक कारणास्तव २०० फुटांचा करण्यात येणार आहे, असे मुख्य सचिव आलोक रंजन यांनी सांगितले. मैत्रेय प्रकल्पात हा पुतळा उभारला जाणार असून त्यासाठी २५० एकर जमीन दिली जाणार आहे.

पाकिस्तानात मुलींचे गॅस स्टेशन
इस्लामाबाद-  लाहोर येथे मुलींनी चालवलेले गॅस स्टेशन अस्तित्वात आले असून तेथे मुस्लीम मुलींच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. झूम पेट्रोल स्टेशन असे त्याचे नाव असून तेथे महिला व मुलीच काम करतात. सकाळी ८ ते सायंकाळी पाच व सकाळी १० ते सायंकाळी ७ अशा दोन वेळात महिला व मुली तेथे काम करतात व तिथे पुरुषांपेक्षा त्यांना वेतन जास्त आहे. मुलींना तेथे थेट काम दिले जाते पुरुषांना मात्र त्रयस्थ कंत्राट दिले जाते, असे पेट्रोल स्टेशनचे व्यवस्थापक साइब यांनी सांगितले. महिलांसाठी तेथे पुरेशी सुरक्षाही देण्यात आली आहे.

केन बॉम्ब सापडले
मुंगेर, बिहार- बिहारमधील मुंगेर जिल्ह्य़ात भीमबंध जंगलात माओवाद्यांच्या अड्डय़ावर दोन शक्तिशाली केन बॉम्ब सापडले, तसेच फ्यूज वायरही सापडल्या. केंद्रीय राखीव पोलीस दल व पोलीस यांनी संयुक्तपणे राबवलेल्या या मोहिमेत २० किलोचे दोन बॉम्ब व १०० मीटर फ्यूज वायर पठडीहा येथे सापडली, असे पोलीस अधीक्षक वरुणकुमार सिन्हा यांनी सांगितले.