जम्मू- काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन करण्यासाठी आपण भाजपशी युती करणार नाही, हे नॅशनल कॉन्फरन्सने स्पष्ट केले असून, पीडीपीला पाठिंबा देण्याच्या आपल्या इराद्याचा पुनरुच्चार केला आहे.
कुठल्याही परिस्थितीत आम्ही भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही, असे नॅकॉचे वरिष्ठ नेते मोहम्मद अकबर लोन यांनी सोमवारी पक्षाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. पीडीपीने राज्यातील लोकांच्या कल्याणाची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.
पश्चिम पाकिस्तानातील निर्वासितांना रहिवासाचा आणि मतदानाचा अधिकार देण्याची शिफारस एका संयुक्त संसदीय समितीने केली आहे. त्याबद्दल विचारले असता लोन म्हणाले, की केंद्राने असा काही प्रयत्न केल्यास आमचा पक्ष त्याविरुद्ध आंदोलन करेल.राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर तीन दिवसांनी पक्षाचे कार्याध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

Story img Loader