कावेरी नदीतून तामिळनाडूसाठी दररोज १० हजार क्यूसेस पाणी सोडण्याची तयारी कर्नाटक सरकारने दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारतर्फे ही बाब मान्य करण्यात आली असून तामिळनाडूला सद्भावनेतून २० सप्टेंबपर्यंत हा पाणीपुरवठा करण्यात येईल.कर्नाटकने दोन कावेरी नदीतून दोन टीएमसी इतके पाणी राज्याला द्यावे, असे आदेश त्या राज्याला देण्यासाठी तामिळनाडूने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्या. डी. के. जैन आणि न्या. मदन लोकूर यांच्या खंडपीठाने मात्र ती फेटाळली आहे. यासंबंधात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कावेरी जल प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून कावेरी तंटाप्रकरणी त्यांच्यातर्फे सौहार्दपूर्ण तोडगा काढला जाईल, असा आशावाद सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठाने व्यक्त केला आहे.

Story img Loader