सुशीलकुमार शिंदे यांची भावना
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरुला फासावर चढविल्याने राष्ट्रकर्तव्याची पूर्तता झाल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गृहमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती आणि ती पार पाडण्याचे कर्तव्य आपण बजावले, असे अजमल कसाबपाठोपाठ चार महिन्यांच्या आत अफजल गुरुला फासावर चढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिंदे म्हणाले.
तिहार तुरुंगात अफजल गुरुला फासावर लटकविले जाण्यापूर्वीच २, कृष्णन मेनन मार्गवरील शिंदे यांच्या बंगल्यातील फोन पहाटेपासून खणखणत होते. काही वृत्तवाहिन्यांचे पत्रकार त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून अफजल गुरुला फासावर चढविले जाणार असल्याचे वृत्त खरे आहे काय, याची शहानिशा करीत होते. पण शिंदे यांनी तेव्हा त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मी तुम्हाला याविषयीची नेमकी स्थिती साडेआठनंतरच सांगू शकतो, असे सांगून त्यांनी नेहमी संपर्कात असणाऱ्या पत्रकारांशी बोलताना वेळ मारून नेली. अफजल गुरुला फासावर चढवेपर्यंत शिंदे यांच्याही संयमाची कसोटी लागली होती.
दोन तासांनंतर अफजल गुरुला फाशी देण्यात आल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले तेव्हा शिंदे यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारापुढे प्रसिद्धी माध्यमांची झुंबडच उडाली. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच त्यांनी सकाळी दहा वाजता छोटेसे निवेदन केले आणि ते बंगल्यात परत निघून गेले. अफझलच्या फाशीची बातमी येताच शिंदे यांच्या मोबाईलवर त्यांचे अभिनंदन करणारे असंख्य फोन आणि एसएमएसचा मारा सुरु झाला. शक्यतोवर सर्वांचेच फोन घेण्याचे तसेच प्रत्येक एसएमएस वाचून त्यावर आभार व्यक्त करण्याचे ते प्रयत्न करीत होते. अफजलला फासावर चढवून तुम्ही फार कणखर निर्णय घेतला, असा निर्णय घेण्यासाठी असीम धाडसाची आवश्यकता असते, असे कौतुक करणाऱ्या हजारो एसएमएसनी त्यांचा इनबॉक्स भरून गेला होता.
उद्या अफझलला फासावर लटकविणार असल्याची याची जाणीव असलेले शिंदे शुक्रवारी रात्री उशिरा शांतपणे झोपी गेले. पण पहाटे पहाटे दिल्लीतील पत्रकारांनी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या अतिव्यस्त दिवसाची दिशा निश्चित केली. बंगल्यात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही, असे बजावून ते दुपारी सकाळच्या घटनाक्रमाचा आढावा घेत होते. सायंकाळी ताजे टवटवीत होत ते पुन्हा नव्या जोमाने शुभेच्छांचा स्वीकार करण्यात गुंतले. उद्या मेघालय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सकाळी शिलाँगला रवाना होणार आहेत.
राष्ट्रकर्तव्य बजावले!
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरुला फासावर चढविल्याने राष्ट्रकर्तव्याची पूर्तता झाल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गृहमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती आणि ती पार पाडण्याचे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-02-2013 at 03:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National duty performed