येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर तिरंगा उलटा फडकाविण्यात आल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. शुक्रवारी सकाळी कार्यालयात आलेल्या काही अभ्यागतांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेची कुणकुण लागताच मीडियाच्या प्रतिनिधींनी उलटय़ा स्थितीत फडकाविण्यात आलेल्या तिरंग्याचे छायाचित्र घेण्यास सुरुवात केली. तेव्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तिरंगा उतरवून तो योग्य पद्धतीने पुन्हा फडकाविला.या घटनेची चौकशी केली असता ज्या व्यक्तीने तिरंगा फडकाविला होता ती व्यक्ती अलीकडेच बदली होऊन येथे आली होती. त्यामुळे त्याला या बाबतची कल्पना नव्हती असा युक्तिवाद काही अधिकाऱ्यांनी केला.

Story img Loader