नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर सोनिया यांनी आपण इंदिरा गांधी यांची सून असल्याचे सांगत कोणालाही घाबरत नसल्याचे आक्रमक वक्तव्य केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया आणि राहुल गांधी यांना जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार देत त्यांना १९ डिसेंबरला सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाच्या निर्णयावर निराश होण्याचे काहीच कारण नाही. मी इंदिरा गांधी यांची सून असून, मी कोणालाही घाबरत नाही, असे सोनिया म्हणाल्या.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करत कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सोनिया, राहुल यांच्यासह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेड यांच्याविरुद्ध न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. या नेत्यांनी समन्सला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देऊन ते रद्द करण्याची मागणी केली होती. हे समन्स रद्द करण्यात यावे, तसेच आपल्याला कनिष्ठ न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती राहुल आणि सोनिया यांनी केली होती, परंतु न्या. सुनील गौर यांनी सोमवारी त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.
मी कोणालाही घाबरत नाही, हेराल्ड प्रकरणावर सोनिया गांधींचे वक्तव्य
न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाच्या निर्णयावर निराश होण्याचे काहीच कारण नाही
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 08-12-2015 at 15:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National herald case sonia gandhi says shes not scared of anyone