काँग्रेसचे मुखपत्र ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ‘यंग इंडियन’ कंपनीचे प्रमुख समभागधारक राहुल गांधी यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने दहा तास चौकशी केली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये पी चिदंबरम यांचाही समावेश होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून हाड मोडलं आहे.

पोलिसांनी धक्का दिल्यानंतर पी चिदंबरम जखमी झाले असून हाड मोडलं असल्याचा दावा रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. चिदंबरम यांचा चश्माही जमिनीवर फेकला गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

राहुल गांधींची ‘ईडी’कडून दहा तास चौकशी ; देशभर काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन, नेत्यांची धरपकड

“मोदी सरकारने सर्व हद्द पार केल्या आहेत. माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यांचा चश्मा जमिनीवर फेकला गेला. त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून डाव्या बाजूचं हाड मोडलं आहे. खासदार प्रमोद तिवारी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या डोक्याला जखम असून त्यांचंही हाड मोडलं आहे. ही लोकशाही आहे का?,” अशी विचारणा रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे.

पी चिदंबरम यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून जखमी झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

“जेव्हा तीन पोलीस कर्मचारी तुमच्या अंगावर धावून येतात तेव्हा फक्त हेअरलाइन फ्रॅक्चर होत असेल तर सुदैव आहे. डॉक्टरांनी जर हेअरलाइन क्रॅक असेल तर १० दिवसात तो बरा होईल असं सांगितलं आहे. मी ठीक आहे आणि उद्यापासून कामावर जाणार आहे,” अशी माहिती पी चिदंबरम यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ची मूळ कंपनी ‘असोसिएट जर्नल’ आणि ‘यंग इंडियन’ कंपनीतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ‘ईडी’च्या चार अधिकाऱ्यांच्या चमूने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. राहुल गांधी यांची ही चौकशी दोन टप्प्यांमध्ये झाली. सकाळच्या सत्रात साडेअकराच्या सुमारास ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी राहुल यांचा जबाब नोंदवण्यास सुरूवात केली. तीन तास चौकशी झाल्यानंतर भोजनासाठी मध्यंतर झाले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रातही राहुल गांधी यांचे जबाव नोंदवले गेले. बहुतांश प्रश्नांना राहुल गांधी यांनी हो-नाही एवढीच उत्तरे दिली. अनेक प्रश्नांसंदर्भात माहिती नसल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे कळते.

‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सोनिया गांधी यांचीही ‘ईडी’ चौकशी करणार आहे. मात्र, करोनाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे सोनिया यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘ईडी’ने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल आदी नेत्यांचीही चौकशी झाली आहे.