मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर धरण प्रकल्पात जमीनीच्या बदल्यात जमीन देण्याचे आश्वासन मुंख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहे. गेले सोळा दिवस जल सत्याग्रह करणा-या गावक-यांची मागणीला अतिशय गंभीररित्या घेऊन धरणातील पाण्याची पातळी १८९ मीटर खाली घेण्याचेही चौहान यांनी जाहीर केले आहे.
चौहान यांनी आज सकाळी भाजप आमदार लोकेंद्र सिंह तौमर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या विस्थापितांच्या एका मंडळासोबत चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सरकार ने जमीनीच्या बदल्यात जमीन आणि धरणातील पाण्याची पातळी १८९ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारद्वारे वर्ष २००८ साली विस्थापितांच्या विशेष अनुदानाची रक्कम सरळ त्यांच्या बॅंकेच्या खात्याय जमा करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, जमीनीचा लाभ त्यांनाच मिळेल जे ९० दिवसामध्ये त्यांना मिळालेल्या विशेष अनुदानाची रक्कम परत करतील. या विस्थापितांना सरकारी भूमी बॅंकेच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.

Story img Loader