केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीसह ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ या अन्य दोन पक्षांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयनंतर राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

‘एबीपी माझा’शी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले, “निवडणूक आयोगानं जो काही निर्णय घेतला आहे, त्याची अधिकृत माहिती आम्हाला अद्याप प्राप्त झाली नाही, त्यांच्या निर्णयाची प्रत आम्हाला मिळाल्यानंतर निश्चित यावर कायदेशीर विचार करावा लागेल. कारण १५-२० दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जाबाबत आमची बाजू मांडण्याची मुभा दिली होती.”