पीटीआय, बीजिंग
भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता राखण्यासाठी आणि स्थिर संबंधांना चालना देण्यासाठी उपाययोजना सुरू ठेवण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधी चर्चेदरम्यान द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सहा कलमी उपायांवर सहमती झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
हेही वाचा : सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी
भारत-चीन सर्वंकष संबंधांचा राजकीय दृष्टीकोन कायम राखण्याचे महत्त्व याचा या चर्चेदरम्यान पुनरुच्चार करण्यात आला अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. सीमेवर सैन्यतैनातीपूर्वी असणारी सामान्य स्थिती कायम राहावी यासाठी शांतता कायम राखणे आवश्यक आहे यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले. २०२०मधील संघर्षाच्या घटनांवरून दोन्ही देश सीमेवर शांतता राखण्याचा धडा शिकले आहेत असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. योग्य राजनैतिक आणि लष्करी यंत्रणांचा वापर करण्याचे, समन्वय राखण्याचे आणि मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमापार सहकार्य, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे या उपाययोजना हाती घेतल्या जातील.