जागतिक पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने मोबाइल फोनवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणी अमेरिकेने समर्थनाची भूमिका घेतली असून अशा प्रकारे टेहळणी करण्याचे अधिकार अध्यक्षीय आदेशानुसार देण्यात आले असून जगातील अतिशय घातक अशा भागांमध्ये हा टेहळणी कार्यक्रम राबवण्यात आला आहे, असे अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या प्रवक्तया व्ॉनी व्हाइन्स यांनी सांगितले, की अमेरिकेचा हा टेहळणी कार्यक्रम फिसाचे (फॉरेन इंटेलिजन्स सव्र्हिलन्स अॅक्ट) उल्लंघन करीत नाही. राष्ट्रीय सुरक्षा संस्था रोज पाच अब्ज सेलफोन नोंदी गोळा करीत होती व त्यात काही अमेरिकी व काही इतर देशातील नागरिकांचा समावेश आहे, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले होते.
व्हाइन्स यांनी सांगितले, की आम्ही हा कार्यक्रम सगळीकडे राबवलेला नाही. एनएसएला प्रत्येक सेलफोनची माहिती नाही. सेलफोनवरची माहिती मिळवण्याचे काम फक्त युद्ध क्षेत्र, दहशतवाद्यांचे अस्तित्व आहे तेथेच करण्यात आले आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीचा थेट उल्लेख न करता त्यांनी सांगितले, की परदेशी लोकांच्या सेलफोनवर लक्ष ठेवण्यात आले व त्यात देशांतर्गत व्यक्तींचा समावेश नव्हता. जरी अमेरिकी व्यक्तींच्या सेलफोनवरील माहिती ‘इ ओ १२३३३’ या मोहिमेअंतर्गत घेतली असेल, तरी त्यात फिसा कायद्याने घालून दिलेल्या कोणत्याही र्निबधांचे उल्लंघन केलेले नाही.
व्हाइन्स म्हणाल्या, की जर ‘इ ओ १२३३३’ या व्हाइट हाउसच्या आदेशान्वये अमेरिकी नागरिकांवर टेहळणी करण्याचे किंवा हेरगिरी करण्याचे अधिकार एनएसएला आहेत. या अधिकारात आम्ही सहेतूक माहिती गोळा करीत नाही असा दावा त्यांनी केला. सहेतुक माहिती गोळा करण्यासाठी फिसा अंतर्गत स्वीकृती घेणे आवश्यक असते. सीआयएचा माजी कंत्राटदार व जागल्या एडवर्ड स्नोडेन याने मिळवलेल्या वर्गीकृत कागदपत्रांच्या आधारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने ही बातमी दिली होती. एनएसएने लोकांच्या सेलफोन वापरकर्त्यांवर पाळत ठेवण्याचे कारण नसताना को ट्रॅव्हलर या विश्लेषण साधनाचा वापर करून त्यांनी मोठय़ा प्रमाणावर ठिकाणे टेहळणीसाठी निवडली होती.
सेलफोनच्या केलेल्या टेहळणीचे समर्थन
जागतिक पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने मोबाइल फोनवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणी अमेरिकेने समर्थनाची भूमिका घेतली असून
First published on: 08-12-2013 at 03:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National security agency defends surveillance programme