आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाच्या उद्घाटनप्रसंगी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल धोवन यांचा विश्वास
दहशतवाद आणि अनियंत्रित धोके यावर मात करणे कोणत्याही एका नौदलाला शक्य नाही म्हणूनच जगभरातील नौदलांचे नेटवर्क हा परवलीचा शब्द ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांत भारतीय नौदलाने या क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या बळावर भली मोठी झेप घेतली असून ज्या िहदी महासागराच्या टापूतून जगातील ८५ टक्के व्यापार उदीम होतो, त्या क्षेत्रामध्ये सर्वदूर जाळे पसरलेले (नेटवक्र्ड) प्रबळ बहुआयामी नौदल हा भारतीय नौदलाचा नवा परिचय असल्याचे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल रॉबिन धोवन यांनी शुक्रवारी येथे केले.
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाला शुक्रवारी विशाखापट्टणम येथील कमांड स्टेडियममध्ये आंध्र प्रदेशचे राज्यपाल एएसएल नरसिंहन यांच्या हस्ते सुरुवात झाली.भारताने स्वयंपूर्णतेच्या बळावर आणि जागतिक स्तरावरील कारवायांमध्ये दाखविलेले कर्तृत्व यामुळे संपूर्ण जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आयएफआरमधील राष्ट्रांचा वाढलेला सहभाग हा त्याचेच द्योतक आहे. विशाखापट्टणमचा समुद्र जमिनीलगत खोल आहे. अनेक युद्धनौकांनी एकाच वेळेस नांगर टाकण्यासाठी ही योग्य जागा असल्याने निवड केल्याचे ते म्हणाले.

..म्हणूनच महासागरातून एकात्मता!
दहशतवाद आणि अनियंत्रित धोक्यांच्या आव्हानावर जगभरातील सर्व नौदलांचे परस्परांशी असलेले सहकार्य आणि एकत्रित कारवाई याद्वारे त्यावर सहज मात करता येईल. म्हणूनच जागतिक हितासाठी सुरक्षा आणि स्थर्य यावरच जगभरातील नौदलांचे लक्ष केंद्रित झालेले असेल. हाच उद्देश सफल करण्यासाठी भारतीय नौदलाने महासागरातून ‘एकात्मता’ ही बिरुदावली असलेल्या आंतरराष् ट्रीय नौदल ताफा संचलनाचे आयोजन केल्याचे प्रतिपादन नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल रॉबिन धवन यांनी शुक्रवारी येथे केले.

सागरी इतिहास इंटरनेटवर
भारताच्या समृद्ध सागरी इतिहासासंबंधी पुस्तकाचे प्रकाशन या आयएफआरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Story img Loader