आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाच्या उद्घाटनप्रसंगी नौदलप्रमुख अॅडमिरल धोवन यांचा विश्वास
दहशतवाद आणि अनियंत्रित धोके यावर मात करणे कोणत्याही एका नौदलाला शक्य नाही म्हणूनच जगभरातील नौदलांचे नेटवर्क हा परवलीचा शब्द ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांत भारतीय नौदलाने या क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या बळावर भली मोठी झेप घेतली असून ज्या िहदी महासागराच्या टापूतून जगातील ८५ टक्के व्यापार उदीम होतो, त्या क्षेत्रामध्ये सर्वदूर जाळे पसरलेले (नेटवक्र्ड) प्रबळ बहुआयामी नौदल हा भारतीय नौदलाचा नवा परिचय असल्याचे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन नौदलप्रमुख अॅडमिरल रॉबिन धोवन यांनी शुक्रवारी येथे केले.
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाला शुक्रवारी विशाखापट्टणम येथील कमांड स्टेडियममध्ये आंध्र प्रदेशचे राज्यपाल एएसएल नरसिंहन यांच्या हस्ते सुरुवात झाली.भारताने स्वयंपूर्णतेच्या बळावर आणि जागतिक स्तरावरील कारवायांमध्ये दाखविलेले कर्तृत्व यामुळे संपूर्ण जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आयएफआरमधील राष्ट्रांचा वाढलेला सहभाग हा त्याचेच द्योतक आहे. विशाखापट्टणमचा समुद्र जमिनीलगत खोल आहे. अनेक युद्धनौकांनी एकाच वेळेस नांगर टाकण्यासाठी ही योग्य जागा असल्याने निवड केल्याचे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा