नौदलाच्या चार कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर मंगळवारी दुपारी विशाखापट्टणम्नजीक कोसळले. यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले असले तरी अन्य दोघे बेपत्ता आहेत.प्रशिक्षणासाठी उड्डाण केल्यानंतर, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हे चेतक हेलिकॉप्टर  कोसळले, अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली. चेतक आणि चीताह ही नौदलाची हेलिकॉप्टर १९६० आणि १९७० च्या दशकातील असून नौदलाने त्यांच्या ऐवजी नवीन हेलिकॉप्टर घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Story img Loader