बाळगल्याचा नौदल अधिकाऱ्यावर आरोप
इसिसचे चिन्ह असलेला भ्रमणध्वनी बाळगल्याचा आरोप मलेशियातील एका नौदल अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. मलेशियात इसिसच्या समर्थकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे.
इसिसशी संबंधित घटक बाळगल्याचा आरोप झकारिया अहमद (२७) या नौदल अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. बुकीत अमन पोलीस मुख्यालयातील एका छावणीत या अधिकाऱ्याकडे इसिसचे चिन्ह असलेला भ्रमणध्वनी असल्याचे आढळले.
या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात येणार नाही, त्याचप्रमाणे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्यात येणार नाही, असे स्पष्ट करून दंडाधिकारी एरी शाहरीमन यांनी या बाबत ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप लष्कराच्या दोघा अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. मोहम्मद झुरैदी शफीक झुल्केफ्ली (२७) आणि मोहम्मद अदिबझकीर (२८) अशी त्यांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navy officers use isis logo on phone