पाकिस्तानने १९९९ साली लाहोर कराराचे उल्लंघन केलं, ती आपली चूक झाली, अशी कबुली पाकिस्ताने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. पाकिस्तानने केलेल्या पहिल्या अणुचाचणीला आज २६ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही कबुली दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आधी तुमचा देश सांभाळा”, निवडणुकीवर भाष्य करणाऱ्या पाकिस्तानी नेत्याला अरविंद केजरीवालांनी सुनावले

नेमकं काय म्हणाले नवाज शरीफ?

“२८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर काही महिन्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तापित करण्याच्या उद्देशाने लाहोर येथे एक करार करण्यात आला. आपण पाकिस्तानने १९९९ साली कारगिल युद्धाच्या रुपाने त्या कराराचं उल्लंघन केलं. ती आपली चूक झाली”, अशी प्रतिक्रिया नवाज शरीफ यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी इम्रान खान यांनाही लक्ष्य केलं. “पाकिस्तानने अनुचाचण्या करू नये, यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी ५ अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी ते पैसे घेण्यास नकार दिला. माझ्या ऐवजी जर इम्रान खान सारखी व्यक्ती असती, तर त्यांनी नक्कीच ते पैसे घेतले असते”, अशा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – श्रीलंकन सरकार ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करून मायदेशी पाठवणार, दोन्ही देशांमध्ये मोठा करार

लाहोर करार नेमका काय होता?

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी लाहोर येथे एका करारावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तापित करणे तसेच नागरिकांमध्ये संपर्क वाढवणे या कराराचा मुख्य उद्देश होता. मात्र, या करारावर स्वाक्षरी झाल्याच्या काही महिन्यांनंतर पाकिस्तानने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परिणामता दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले. या युद्धालाच कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawaz sharif admits that pakistan violated lahore declaration with india in 1999 kargil war spb