* इम्रान खान यांचा पक्ष दुस-या स्थानावर
पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सुरू असलेल्या मतमोजणीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गट(पीएमएल-एन) पक्षाने आघाडी घेतल्याने नवाझ शरीफ तिस-यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. २७२ जागांपैकी २६४ जागांच्या निकालानुसार नवाझ शरीफ यांचा पक्ष १२५ जागांवर आघाडीवर आहे तर, माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्ष ३४ जागांवर आणि असिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पिपल्स पार्टी ३२ जागांवर आघाडीवर आहे. जाहीर होत असलेल्या निकालांनुसार नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे तर, इम्रान खान यांचा पक्ष दुस-या स्थानावर आहे. 

Story img Loader