पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावण्याचा मनोदय पाकिस्तान मुस्लिम लीग-एन पक्षाचे प्रमुख आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नवाझ शरीफ यांनी सोमवारी व्यक्त केला. 
डॉ. सिंग यांनी रविवारी फोनवरून नवाझ शरीफ यांना निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले होते. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी नवाझ शरीफ यांच्यासोबत चर्चेची तयारीही डॉ. सिंग यांनी दाखविली होती. त्या स्वरुपाचे पत्रही त्यांनी पाकिस्तानला पाठविले आहे. नवाझ शरीफ यांनी सोमवारी डॉ. सिंग यांना फोन करून त्यांना पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण दिले. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्याचे निमंत्रणही देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नवाझ-ए-पाक 

Story img Loader