छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून आपल्या या आवाहनाच्या पुष्टर्थ त्यांनी मतदारांना ‘यापैकी कोणीही नाही’ (नन ऑफ दी अबाव्ह – एनओटीए) हा पर्याय निवडण्याचे आदेश दिले आहेत. याउपरही मतदारांनी मतदानाचा निर्णय घेतलाच तर त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी नक्षलवाद्यांनी बनावट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणली असून त्याद्वारे बस्तरमधील मतदारांना ‘एनओटीए’च्या पर्यायाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारची काही प्रशिक्षण केंद्रे सुकमा आणि दांतेवाडा येथे सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बिजापूर आणि नारायणपूर येथेही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मतदान केंद्रापर्यंत मतदार पोहोचलेच तर त्यांना ‘एनओटीए’ पर्याय निवडण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या पर्यायाचे महत्त्व मतदारांना पटवून देण्यासाठी नक्षलवाद्यांचे काही नेतेही विविध ठिकाणी तळ ठोकून आहेत.

Story img Loader