छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात काँग्रेसचे २७ पदाधिकारी ठार झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ज्या ठिकाणी भीषण हत्याकांड झाले त्या दर्भा भागातील केंद्रीय राखीव पोलीस दलाची छावणी सात दिवस आधी हलवण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न प्रदेश काँग्रेसने उपस्थित केला आहे.
दर्भा भागात असलेली सीआरपीएफची छावणी हिंसाचारापूर्वी सात दिवस स्थलांतरित करण्यात आली होती. त्यामागचे कारण काय, असा प्रश्न प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते शैलेश नितीन त्रिवेदी यांनी बुधवारी केला. गुप्तचर यंत्रणांनी राज्य सरकारला संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना दिली होती. मात्र राज्य सरकारने याची गंभीर दखल न घेता काँग्रेसच्या यात्रेला योग्य ती सुरक्षा पुरविली नसल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला.
काँग्रेस यात्रेची संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक राज्य सरकारला दिले होते. मात्र घटनास्थळी एकही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला नव्हता, असेही ते म्हणाले.
भाजपचे माजी आमदार अजय चांदरकर यांनी स्पष्ट केले की, हल्ल्याच्या पूर्वी गुप्तचर यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती, असे सांगितले.

Story img Loader