छत्तीसगडच्या घुसखोरीग्रस्त कोंडागाव जिल्ह्य़ात शुक्रवारी पहाटे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी गटाचा कमांडर ठार झाला.
बंदी घालण्यात आलेल्या नक्षलवादी गटाचा बरदा दालमचा कमांडर फूलसिंग हा पहाटे पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झाला. काही जहाल नक्षलवादी या परिसरात दडून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घानोरा जंगलाकडे पोलीस पथक पाठविले होते.
पोलिसांनी आपल्याला घेरल्याचे लक्षात येताच या जहाल नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास ही धुमश्चक्री सुरू होती. नक्षलवाद्यांनी जंगलात पसार होण्याचा प्रयत्न केला.
तथापि, एका नक्षलवाद्याला पोलिसांनी पकडले. त्याचे नाव राकेश असे असून तो अंतगड दालमचा कमांडर आहे. त्यानंतर पोलिसांना फूलसिंगचा मृतदेह मिळाला. त्याच्या मृतदेहाजवळ दोन हातबॉम्ब, नक्षलवादी साहित्य, दस्तऐवज, रोजनिशी, औषधांचा साठा मिळाला. सदर रोजनिशीमध्ये नक्षलवादी कारवायांबाबतची महत्त्वाची माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.
छत्तीसगडमध्ये जहाल नक्षलवादी ठार
छत्तीसगडच्या घुसखोरीग्रस्त कोंडागाव जिल्ह्य़ात शुक्रवारी पहाटे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी गटाचा कमांडर ठार झाला.
First published on: 02-05-2015 at 04:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal killed in chhattisgarh