नक्षलवादी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलासमोर मोठे आव्हान असते आणि त्यामुळे सैनिकांची हानी कमीत कमी कशी होईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येतील, असे दिलीप त्रिवेदी यांनी शनिवारी येथे सांगितले. देशाच्या सर्वात मोठय़ा अशा निमलष्करी दलाच्या महासंचालकपदाची सूत्रे त्रिवेदी यांनी स्वीकारली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
त्रिवेदी हे उत्तर प्रदेशातील भारतीय प्रशासन सेवेच्या १९७८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. याआधी त्यांनी सीमा सुरक्षा दल तसेच इंडो तिबेट सीमा पथकातही मोठय़ा जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्ये आदी ठिकाणीही केंद्रीय राखीव दलासमोर मोठी आव्हाने आहेत आणि त्यामुळे आमच्यासमोरील ही आव्हाने कमी कशी करता येतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्रिवेदी म्हणाले.

Story img Loader