छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून दहशत पसरवण्याचे प्रयत्न
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नारायणपूर : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून एका ४५ वर्षीय व्यक्तीला घरातून खेचून बाहेर काढत त्याची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची घटना छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात घडली. शालूराम पोटाई असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ही घटना रविवारी रात्री घडली. नक्षलवाद्यांनी परिसरातील विकासकामे खोळंबण्यासाठी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी निराशेतून निष्पाप नागरिकाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, ‘गणवेश’ घातलेल्या १५ ते २० सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोटाई यांच्या घराला वेढा घातला. ते जेवत असताना त्यांना रस्त्यावर ओढून नेले. नक्षलवाद्यांनी त्याला कुटुंब आणि स्थानिकांसमोर बेदम मारहाण केली. तसेच घटनास्थळावरून जाण्यापूर्वी त्याची हत्या केली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. माओवाद्यांच्या कुतुल एरिया कमिटीने पत्रक जारी करत पोटाई हा पोलिसांचा खबरी म्हणून काम करत होता, असे म्हटले आहे. तर मृताशी संबंध नाकारताना नक्षलवाद्यांनी या भागातील विकासकामे खोळंबण्यासाठी गावकऱ्याची हत्या केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> पुलवामात दोन दहशतवादी ठार; सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई
छत्तीसगडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून पोलिसाची हत्या
सुकमा : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील एका गावात पोलीस हवालदाराची अज्ञात व्यक्तींनी वार करून हत्या केल्याची घटना घडली. नक्षलवाद्यांच्या छोट्या कृती दलाने ही हत्या केल्याचे प्रथमदर्शनी हल्ल्याच्या पद्धतीवरून समोर आले आहे. सोडी लक्ष्मण असे मृत पोलिसाचे नाव असून, गदिरस गावात रविवारी मध्यरात्री ते जत्रेत गेले असताना ही हत्या झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येची माहिती मिळाल्यानंतर गदिरस पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी हल्लोखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेलंगणमध्ये आयईडी स्फोटात गावकऱ्याचा मृत्यू
हैदराबाद : तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्यातील जंगल परिसरात सोमवारी बंदी घातलेल्या ‘सीपीआय’च्या (माओवादी) सदस्याने पेरलेल्या आयईडी स्फोटात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. वाझेदू मंडळातील कोंगल गावाजवळ पेरलेल्या ‘आयईडी’वर पाय ठेवताच स्फोट होऊन त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत व्यक्ती मुलगा आणि इतर तीन जणांसह जळाऊ लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात फिरत होते, त्यावेळी ही घटना घडली. ‘माओवादी’ आपली दहशत पसरवण्यासाठी ज्या भागात लोक नियमितपणे ये-जा करतात तेथे ‘आयईडी’ पेरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी वझेडू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० मे रोजी अशाच स्फोटात एका पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला होता.