रशियाने मंगळवारी बेबीन यार होलोकॉस्ट स्मारकावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जगभरातील ज्यूंना मौन सोडण्याचे आवाहन केले आहे. “मी आता जगातील सर्व ज्यूंना संबोधित करत आहे. इथं काय होत आहे ते तुम्हाला दिसत नाही का?… असेच मौन राहिल्याने नाझीवादाचा जन्म होतो. त्यामुळे आपल्या नागरिकांच्या हत्येबद्दल बोला,” असं वोलोडिमिर झेलेन्स्की बुधवारी म्हणाले. एएफपी या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात वृत्त दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

VIDEO: रशियन सैन्याला थांबवण्यासाठी तो टँकवर चढला, पण लष्करानं घेरलं अन्…..

बोलताना वोलोडिमिर झेलेन्स्की मंगळवारी युक्रेनच्या किव्हमधील बेबीन यार होलोकॉस्ट स्मारकावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांचा संदर्भ देत होते. युक्रेनियन अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला भयानक होता आणि यामुळे राज्याच्या ब्रॉडकास्टिंगवर देखील परिणाम झाला. तसेच होलोकॉस्ट स्मारकावर झालेल्या नुकसानीची तपशीलवार माहिती घेण्यासाठी एक सुरक्षा पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती स्मारकाच्या प्रवक्त्याने दिली.

बेबीन यार स्मारक हे ३३ हजारपेक्षा जास्त ज्यूंच्या सामूहिक कबरीवर बांधण्यात आले आहे. १९४१ मध्ये हे शहर नाझींच्या ताब्यात असताना या सर्व ज्यूंना मारण्यात आले होते.

दरम्यान रशियाकडून युक्रेनवर हल्ला सुरूच असून आतापर्यंत शेकडो लोकांनी या युद्धात प्राण गमावले आहे.