सिमला :येथे झालेल्या सोहळय़ात हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांचा रविवारी शपथविधी उत्साहात झाला. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शपथविधीनंतर सुखू यांनी सांगितले, की आम्ही पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार देऊ. राज्यातील जनतेला निवडणूक प्रचारात दहा आश्वासने दिली आहेत. त्यांची आम्ही निश्चित पूर्तता करू. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना (ओपीएस) लागू करू.

CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

सिमला येथे रविवारी झालेल्या एका समारंभात मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तथापि इतर कोणीही मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. राज्यात १२ सदस्यीय मंत्रिमंडळ बनवता येते.

सुखू यांनी स्वच्छ व प्रामाणिक सरकारचे आश्वासन देताना सांगितले, की काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. ते म्हणाले, की आम्हाला केवळ सत्तेसाठी सत्ता नको होती. आम्हाला व्यवस्था बदलायची आहे. मला थोडा वेळ द्या. कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. नवीन व्यवस्था आणि नवीन विचार आणण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.

बसचालकाचे पुत्र व काँग्रेसकडून चार वेळा आमदारपदी निवडून आलेल्या सुखविंदर सिंग सुखू यांच्या शपथविधीस पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वद्रा उपस्थित होत्या. काँग्रेसचे सरकार असलेले राजस्थान व छत्तीसगडनंतर हिमाचल प्रदेश हे तिसरे राज्य ठरले आहे. या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व भूपेश बघेल, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा, हिमाचल काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, ज्येष्ठ नेते सचिन पायलट तसेच सुखू यांची आई, पत्नी, मुली व कुटुंबीय या सोहळय़ास उपस्थित होते. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी ५८ वर्षीय सुखू यांना मुख्यमंत्रिपदाची तसेच मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते साठ वर्षीय मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. ते राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री असतील.

नादौनचे आमदार व तळागाळातील नेते सुखू यांचा उदय हे पिढीगत बदलाचे प्रतीक आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा या राज्यात पक्षसंघटनेत व राजकारणात पाच दशके प्रभाव होता. शपथविधी सोहळय़ापूर्वी पक्षनेत्यांनी सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या वीरभद्र सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. काँग्रेस समर्थक-कार्यकर्ते पारंपरिक पोशाखात सोहळय़ास उपस्थित होते. लोकसंगीताच्या तालावर नाचत  ‘सुखूभाई जिंदाबाद’चे नारे दिले जात होते.  संभाव्य मंत्र्यांना खांद्यावर उचलून कार्यक्रमस्थळी आणले गेले.

सुखू यांची मुख्यमंत्रिपदी निवड करून काँग्रेसने आपले सत्ताकेंद्र हिमाचलच्या वरच्या भागातून राज्याच्या निम्न भागात हलवल्याचे मानले जाते. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे सुखू हे हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथील आहेत. हिमाचलच्या या निम्न भागातील मुख्यमंत्री होणारे ते पहिले काँग्रेस नेते आहेत. त्यांच्या मतदारसंघात १९६६ मध्ये हिमाचलमध्ये विलीन झालेल्या नालागढ, उना, हमीरपूर, कांगडा आणि कुल्लूच्या खालच्या पर्वतीय क्षेत्राचा समावेश आहे. वाय. एस. परमार, वीरभद्र सिंग व रामलाल ठाकूर यांच्यासह सर्व माजी काँग्रेस मुख्यमंत्री हिमाचलच्या वरील भागाच्या प्रदेशातील होते. भाजपच्या प्रेमकुमार धुमल यांच्यानंतर सुखू हे हमीरपूर जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री असतील.

बसचालकाचा मुलगा मुख्यमंत्रीपदी

हिमाचल राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाचे पुत्र असलेले सुखविंदर सिंग सुखू यांनी विद्यार्थी जीवनात संजौली येथील शासकीय महाविद्यालयात ‘वर्ग प्रतिनिधी’ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’चे प्रदेशप्रमुख, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, हिमाचल प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळून त्यांनी आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतली आहे.

मोदींकडून अभिनंदन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुखू यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देताना त्यांना आश्वासन दिले, की हिमाचल प्रदेशच्या विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.