नॅशनल कॉन्फरन्सचे भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी केला. 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, प्रचार सभांमधून त्यांचा प्रभाव दिसून येतो. याचा फायदा भाजपला होईल, असे भाकीत वर्तवत अब्दुल्ला यांनी सोमवारी मोदींची स्तुती केली होती. त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी खुलासा करून आपले मोदी यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, नॅशनल कॉन्फरन्सचे मोदींबरोबर किंवा भाजपबरोबर कोणतेही संबंध नाहीत. हवे असल्यास मी तसे लिहून द्यायला तयार आहे. वेळ आल्यास आम्ही सत्तेपासून लांब राहू. मात्र, (यूपीए) आघाडीतील पक्षांची साथ सोडणार नाही आणि त्यांची फसवणूक करणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा