बुधवारी रात्री ‘युथ एक्स्चेंज’ कार्यक्रमासाठी सिंगापूर दौऱ्यावर जाणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) देशभरातील २० छात्रांना ऐनवेळी दिल्ली विमानतळावरून परतावे लागले.

निधी मंजूर केला नसल्याचे कारण सांगून, संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा दौरा ऐनवेळी रद्द केला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यावर छात्रांचा दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला.

Story img Loader