एनसीईआरटीने १२ वीच्या राज्यशास्त्रातील पुस्तकातील अभ्यासक्रमात काही बदल केले असून ऐतिहासिक घटनांचा अनुल्लेख केला आहे. अयोध्या वादावरचा इतिहास चार पानांवरून दोन पानांवर आणला गेला आहे. तर बाबरी मशिदीचा उल्लेख टाळून त्याजागी ‘तीन घुमट असलेला ढाचा’ असा उल्लेख केला गेला आहे. तसेच अयोध्या प्रकरणात भाजपाची सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर उसळलेली हिंसा, भाजपाशासित राज्यात राष्ट्रपती राजवट आणि अयोध्येतील हिंसाचारानंतर भाजपाने व्यक्त केलेला खेद या घटनांचा उल्लेख या धड्यात करण्यात आला आहे.

द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसारित केले आहे. यापूर्वी ६ एप्रिल रोजी लोकसत्तामध्ये छापून आलेल्या वृत्तामध्ये याबद्दल माहिती देण्यात आली होती. रामजन्मभूमी चळवळीशी निगडित इतिहास, गुजरात दंगल आणि हिंदुत्वाशी निगडित संदर्भ हटवले जाण्याबद्दल बातमी देण्यात आली होती.

article 370 jammu and kashmir
संविधानभान : पूल, भिंत की बोगदा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
article 370 jammu kashmir loksatta news
संविधानभान : अनुच्छेद ३७० मध्ये नेमके काय होते?
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
TMC MLA Said We Will Build Babri Mosque Again
Humayun Kabir : “पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद बांधणार आणि…”; तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची घोषणा

बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!

कोणते बदल करण्यात आले?

१६ व्या शतकात मुघल बादशहा बाबरचा सेनापती मीर बाँकी याने बाबरी मशीद बांधली, असा १२वीच्या जुन्या पुस्तकात संदर्भ होता. हा संदर्भ बदलून आता नमूद केले आहे की, १५२८ मध्ये श्रीराम यांच्या जन्मस्थानी तीन घुमट असलेला ढाचा उभारण्यात आला होता. मात्र या ढाच्यावर हिंदू देव-देवतांच्या आकृत्या आत आणि बाहेर स्पष्ट दिसत होत्या.

आधीच्या पुस्तकात फैजाबाद (आता अयोध्या) जिल्हा न्यायालयाने फेब्रुवारी १९८६ साली मशिदीचे टाळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या हालचालींची माहिती दिली होती. तसेच जातीय हिंसाचार, रथयात्रा, १९९२ साली झालेले मशिदीचे पतन, त्यानंतर जानेवारी १९९३ मध्ये उसळलेला हिंसाचार यासंबधी माहिती दिली होती.

नव्या पुस्तकात हे संदर्भ वगळण्यात आले आहेत. अयोध्या वादाचा उल्लेख एका उताऱ्यात करण्यात आला आहे. “१९८६ साली फैजाबाद जिल्हा न्यायालयाने तीन घुमट असलेल्या ढाच्याचे टाळे उघडण्याचा आदेश दिला. त्यामुळे लोकांना त्याठिकाणी प्रार्थना करण्याची संधी मिळाली. ही तीन घुमट असलेली वास्तू श्रीराम यांच्या जन्मस्थानी बांधली असल्याचे मानले जाते. राम मंदिराचा शिलान्यास झाला, मात्र पुढे राम मंदिर बांधण्यास मनाई होती. हिंदू समुदायाला याबाबत चिंता वाटत होती. तर मुस्लीम समुदाय या वास्तूवर ताबा मिळविण्याची मागणी करत होता. जागेच्या हक्कांवरून दोन्ही समुदायांमध्ये तणाव वाढल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. १९९२ साली सदर वास्तूचे पतन झाल्यानंतर अनेक समीक्षकांनी हा भारतीय लोकशाहीच्या तत्त्वांना धक्का असल्याचे विवेचन केले होते”, असा उल्लेख या उताऱ्यात करण्यात आला आह.

नव्या पुस्तकात अयोध्या वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही जमीन हिंदू पक्षकारांची असल्याचा निकाल दिला. जुन्या पुस्तकात ७ डिसेंबर १९९२ रोजी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणेही देण्यात आली होती. या बातमीचे शीर्षक होते, “बाबरी मशिदीचे पतन, केंद्राकडून कल्याण सरकार बरखास्त” तसेच १३ डिसेंबर १९९२ रोजीचे एक कात्रण होते. ज्यामध्ये भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, “अयोध्येत भाजपाचे गणित चुकले” नव्या पुस्तकात ही कात्रणे वगळण्यात आली आहेत.

२०१४ पासून चौथ्यांदा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. एप्रिलमध्येच या नव्या बदलांची घोषणा करण्यात आली होती. ताज्या घडामोडींचा समावेश करून अभ्यासक्रमात दुरुस्ती करण्यात येईल, असे एनसीईआरटीकडून सांगण्यात आले होते.

Story img Loader