NCERT अर्थात ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’नं आपल्या पुस्तकांमधील काही संदर्भ नुकतेच गाळले असून काही संदर्भांमध्ये बदल केले आहेत. एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये केलेले बदल नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या पुस्तकांमधील ऐतिहासिक किंवा राजकीय संदर्भांविषयी देशाच्या राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा एकदा एनसीईआरटीनं आपल्या ११वी व १२वीच्या राज्यशास्राच्या पुस्तकांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले असून त्यासंदर्भात कारणही देण्यात आलं आहे.

हे बदल नेमके का केले? यासंदर्भात आता चर्चा सुरू झाली असून एनसीईआरटीकडून मात्र नियमित प्रक्रियेचा भाग म्हणूनच हे बदल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेषत: राम जन्मभूमी व बाबरी मशीदसंदर्भातील बदलांची चर्चा होत असून ताज्या घडामोडींनुसार त्यात बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
woman decomposed body in fridge
श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
Ramsar Conservation Court Public Interest Litigation filed by High Court
रामसर संवर्धन न्यायालयाकडे; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल
Image Of Zeenat Tigress
‘झीनत’मुळे का सुरू आहे पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये वाद? एका वाघीणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय तणाव!
Bhau Daji Lad Museum, Devendra Fadnavis, Renovation ,
आक्रमणे आणि अनास्थेमुळे भारताच्या ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास – देवेंद्र फडणवीस, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास

NCERT च्या पुस्तकात नेमके कोणते बदल?

एनसीईआरटीनं काही संदर्भ पूर्णपणे गाळले असून काही उल्लेखांमध्ये बदल केले आहेत. उदाहरणार्थ ११वीच्या पुस्तकात धर्मनिरपेक्षतेच्या आठव्या धड्यामध्ये “१ हजारहून जास्त नागरिक, प्रामुख्याने मुस्लीम, २००२ साली गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या दंगलींमध्ये मारले गेले”, असा उल्लेख होता. यात बदल करून “२००२ साली गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या दंगलींमध्ये १ हजारहून जास्त नागरिक मारले गेले”, असा उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्याही दंगलींमध्ये सर्वच धर्माच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो, यात फक्त एका धर्माचा उल्लेख होऊ शखत नाही, अशी भूमिका एनसीईआरटीकडून स्पष्ट केल्याचं इंडिया टुडेच्या वृत्तात नमूद केलं आहे.

पाकव्याप्त काश्मीरबाबतचा संदर्भ बदलला

“भारताचा दावा आहे की हा भूभाग पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावला आहे. पाकिस्तान या भागाला आझाद काश्मीर असं म्हणतो”, असं या पुस्तकात म्हटलं होतं. त्यात बदल करून आता “हा भारतीत भूभाग पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावला असून, त्याला पाकव्याप्त जम्मू-काश्मीर असं नाव दिलं आहे”, असा उल्लेख करण्यात आला आहे.

मणिपूरचाही पुस्तकात उल्लेख

दरम्यान, मणिपूरबाबतचा उल्लेखही बदलण्यात आला आहे. “१९४९ साली विलीनीकरणाच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी मणिपूरच्या महाराजावर दबाव टाकण्यात भारत सरकार यशस्वी ठरलं”, असा उल्लेख पुस्तकात आधी होता. त्यात बदल करून “१९४९ साली विलीनीकराच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी मणिपूरच्या महाराजांना राजी करण्यात भारत सरकारला यश आलं”, असा उल्लेख करण्यात आला आहे.

बाबरीचा संदर्भच वगळला

“राम जन्मभूमी चळवळ आणि बाबरी विध्वंस या घटनांचा राजकीय वारसा काय आहे?” असा उल्लेख पुस्तकात होता. त्यातील बाबरीचा संदर्भ काढून हे वाक्य “राम जन्मभूमी चळवळीचा राजकीय वारसा काय आहे?” असं करण्यता आलं आहे. याव्यतिरिक्त याच धड्यातील बाबरी मशीद व हिंदुत्वाचं राजकारण यासंदर्भातल्या एका संपूर्ण परिच्छेदामध्ये बदल करण्यात आले आहेत.

कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?

“१९९२ साली अयोध्येतील बाबरी मशीद म्हणून ओळखलं जाणारं वादग्रस्त बांधकाम पाडलं जाण्यासाठी त्याआधी घडलेल्या अनेक घटना कारणीभूत होत्या. या घटनेमुळे देशातील राजकारणात अनेक बदलांना सुरुवात झाली. भारतातील राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांवर मोठी चर्चा सुरू झाली. भाजपा आणि हिंदुत्वाच्या राजकारणाच्या उदयाशी या सर्व घडामोडी संबंधित होत्या”, असा एक परिच्छेद पुस्तकात होता. त्यात बदल करण्यात आले.

“अयोध्येतील राम जन्मभूमीसंदर्भात काही शतकांपासून चालत आलेला कायदेशीर व राजकीय वाद भारतातील राजकारणावर प्रभाव टाकू लागला. यातून अनेक राजकीय बदलांचा जन्म झाला. देशात केंद्रस्थानी आलेल्या रामजन्मभूमी चळवळीनं धर्मनिरपेक्षता व लोकशाही यांचे संदर्भच बदलून टाकले. यातूनच पुढे जाऊन ९ नोव्हेंबर १९१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली”, असा बदल या परिच्छेदामध्ये करण्यात आला.

गुजरात दंगलींचा उल्लेखच वगळला!

दरम्यान, या पुस्तकातील ‘लोकशाही अधिकार’ या धड्यात मानवाधिकारांच्या उल्लंघनासंदर्भात असणारा गुजरात दंगलींचा उल्लेख वगळण्यात आला आहे. “गुजरात दंगलींसारखे अनेत मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकार देशभरातून लोकांच्या निदर्शनास आणले जात आहेत”, असा उल्लेख पुस्तकात होता. त्यातून गुजरात दंगलींचा उल्लेख हटवून हे वाक्य “वेगवेगळ्या क्षेत्रात घडणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे प्रकार देशभरातून लोकांच्या निदर्शनास आणले जात आहेत”, असं करण्यात आलं आहे.

Story img Loader