लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण १८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे, आनंद परांजपे, धनंजय महाडीक इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. कॉंग्रेसबरोबरच्या वाटाघाटीत महाराष्ट्रात राष्ट्रवादीला २२ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १८ जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले असून, उर्वरित चार जागांवरील उमेदवारांबाबत अद्याप पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हिंगोली, बीड, मावळ आणि हातकणंगले या मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस गोवा, गुजरात आणि ओडिशामध्ये कॉंग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करीत असल्याचेही त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
राज्यातील मतदारसंघ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
नाशिक – छगन भुजबळ
भंडारा-गोंदिया – प्रफुल्ल पटेल
माढा – विजयसिंह मोहिते-पाटील
उस्मानाबाद – पदमसिंह पाटील
बारामती – सुप्रिया सुळे
सातारा – उदयनराजे भोसले
जळगाव – सतीश पाटील
ठाणे – संजीव नाईक
कल्याण-डोंबिवली – आनंद परांजपे
अहमदनगर – राजीव राजळे
रावेर – मनीष जैन
बुलढाणा – कृष्णराव इंगळे
शिरूर – देवदत्त निकम
परभणी – विजय भांबळे
कोल्हापूर – धनंजय महाडीक
अमरावती – नवनीत राणा
दिंडोऱी – भारती पवार

Story img Loader