पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक लेख लिहिला आहे. या लेखातून देबरॉय यांनी भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे, असं भाष्य केलं आहे. लिखित राज्यघटनेचं वय १७ वर्षे असतं, असा तर्कही त्यांनी संबंधित लेखातून मांडला आहे. एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याने अशाप्रकारे लेख लिहिल्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा लेख प्रकाशित झाल्यानंतर केंद्र सरकारनेही विवेक देबरॉय यांच्यापासून अंतर राखलं आहे. तर संबंधित लेखातून मांडलेले विचार विवेक देबरॉय याचं वैयक्तिक मत आहे, असं स्पष्टीकरण आर्थिक सल्लागार परिषदेनं दिलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या मनात असा विचार आलाच कसा? असा सवाल आव्हाडांनी विचारला. त्यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “काँग्रेसचा मोठा गट महायुतीत जाणार”, वडेट्टीवारांचा उल्लेख करत शिवसेनेच्या खासदाराचा मोठा दावा

हेही वाचा- “…हा माणूस प्रत्यक्षात अत्यंत कृतघ्न निघाला”, वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लिहिलेल्या लेखात म्हटलंय की, “भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे.” पण एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या मनात हा विचार आलाच कसा? लिखित राज्यघटनेचं वय १७ वर्षे असतं, असा अजब तर्क त्यांनी मांडला आहे. ही मंडळी घटनेचा मूळ गाभा असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि लोकशाही यांना विरोध का बरं करत असावी? काही भलता-सलता हेतू तर नाही ना या मागे? शेवटी मी म्हणेन… तुम्ही किती बी करा रे हल्ला… लय मजबूत आहे आमच्या भीमाने लिहिलेल्या संविधानाचा किल्ला… #SaveConstitution”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla jitendra awhad on indian constitution should change statement by bibek debroy economic advisory council pm narendra modi rmm
Show comments