महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. या सरकारला शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय यांची जन की बात ऐकण्यापेक्षा मन की बात करण्यातच स्वारस्य आहे. विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे यातूनच सरकारची भीती स्पष्ट होते असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच या सरकारला आरसा पाहायचा नाही अशीही टीका अमोल कोल्हेंनी केली.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

सरकारची कार्यपद्धती पाहून मला महात्मा गांधींची तीन माकडं आठवतात. सरकारच्या विरोधात काही ऐकू नका, निवडणूक सोडून देशाची स्थिती पाहू नका आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना थंड करुन त्यांची बोलती बंद करायची हेच या सरकारचं धोरण आहे. या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जे सरकार आर्थिक प्रगतीचे आकडे फेकते पण महागाईवर बोलत नाही. माननीय गृहमंत्री म्हणाले की आकडे कधीच खोटं बोलत नाही. देशाची अर्थ व्यवस्था जेव्हा पाचव्या क्रमांकावर आहे तेव्हा देश पर कॅपिटा इन्कमच्या बाबत १४१ व्या स्थानावर आहे असंही अमोल कोल्हे म्हणाले.

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सरकार आलं नाही

देशाची संपत्ती ही ठराविक धनाढ्यांच्या हातातच दिली जाते आहे का? या सरकारने किसान सन्मान निधीचा उल्लेख केला पण किटकनाशकं आणि तणनाशकं यांच्यात झालेल्या तोट्यावर कुणी काही बोललं नाही. अर्थमंत्र्यांनी आज त्यांच्या भाषणात टोमॅटोचा उल्लेख केला. मी आज त्यांना सांगू इच्छितो मागच्या चार ते पाच वर्षांपासून आमच्या महाराष्ट्रतले शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होते, त्यावेळी त्यांचे अश्रू पुसायला हे सरकार आलं नाही.

कांदा उत्पादकांची अवस्था वाईट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदार संघातल्या एका कांदा उत्पादकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आत्महत्या केली आणि त्याचं कारण तुमचं चुकीचं निर्यात धोरण आहे. आज हे सरकार सामान्यांचं सरकार नाही. अशा सरकारवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे मी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण आज या सरकारला मी लोकमान्य टिळक यांचीच एक ओळ सांगणार आहे सरकारचं डोक्यावर ठिकाणावर आहे? याबाबत आत्मचिंतन झालं पाहिजे असं म्हणत अमोल कोल्हेंनी सरकावर टीका केली आहे.

Story img Loader