राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या वक्तृत्वासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. मराठीसहीत ते हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अस्खलितपणे बोलतात. संसदेचे सध्या अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून त्यात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावर अमोल कोल्हे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. तसेच देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी यावर आपल्या अमोघ वक्तृत्वाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. महागाईवर बोलत असताना कोल्हे म्हणाले की, लोकसभेतील एक मंत्री फार वर्षांपूर्वी गॅस सिलिंडर हातात घेऊन महागाईवर बोलत होत्या. आज त्या मंत्री झाल्या आहेत. पण महागाईवर बोलताना त्या दिसत नाही. कदाचित त्या विसरल्या असाव्यात की ‘सास भी कभी बहू थी’, असे म्हणत कोल्हे यांनी स्मृती ईराणी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा