देशभरातील गरीब लोकांची संख्या २१.९ टक्क्य़ांपर्यंत घटल्यासंबंधी नियोजन आयोगाने जाहीर केलेल्या निष्कर्षांवर सत्तारूढ आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी टीका केली आहे. गरीब लोकांसंबंधी निकष नव्याने जारी करावा, अशीही मागणी या संबंधात करण्यात आली आहे.
नियोजन आयोगाची ही आकडेवारी म्हणजे राजकीय खेळी असून सरकारी योजनांपासून गरिबांना याद्वारे वंचित करण्याचा काँग्रेसचा कट असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला. गरिबांच्याप्रती काँग्रेस कसा विचार करते, याचाच हा पुरावा आहे, असे जावडेकर म्हणाले. या आकडेवारीत भाववाढीचा उल्लेखच नाही, असेही त्यांनी दाखवून दिले. लोकांनी दररोज ३४ रुपयांत कसे जगून दाखवावे, हे काँग्रेसने दाखवूनच द्यावे, असे आव्हान जावडेकर यांनी दिले; तर अशी आकडेवारी जाहीर करून नियोजन आयोगाने गरिबांच्या जखमांवर मीठच चोळले असल्याची तोफ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डागली आहे. नियोजन आयोगाच्या या आकडेवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही असहमती दर्शविली असून सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आयोगाने नवीन मर्यादा आखणे आवश्यक आहे, अशी मागणी या पक्षाने केली. नियोजन आयोगाची ही आकडेवारी आम्हाला मान्यच नसल्याचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
नियोजन आयोगाच्या आकडेवारीवर राष्ट्रवादीसह विविध पक्षांची टीका
देशभरातील गरीब लोकांची संख्या २१.९ टक्क्य़ांपर्यंत घटल्यासंबंधी नियोजन आयोगाने जाहीर केलेल्या निष्कर्षांवर सत्तारूढ आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-07-2013 at 04:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp opposition rubbish govts data on poverty