काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांतता निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हत्यासत्राच्या भितीने काश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर हिंदू पंडितांचं स्थलांतर होऊ लागलं आहे. अनेक हिंदू पंडित जम्मूमध्ये येऊ लागले आहेत. परिस्थिती १९९०पेक्षाही भयानक असल्याचं या पंडितांकडून सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंदर्भात निर्माण झालेला काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भाजपाला काही सवाल देखील करण्यात आले आहेत.

“काश्मीर खोऱ्यातून हिंदू पुन्हा एकदा…”

राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या ट्वीटमध्ये भाजपाचं केंद्रात सरकार असतानाच काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. “काश्मीर खोऱ्यातून पुन्हा एकदा हिंदू बाहेर पडतोय. ‘द कश्मीर फाईल्स’ची पुनरावृत्ती होतेय. तेव्हाही भाजपाच्या पाठिंब्याचं सरकार होतं. आजही केंद्रात भाजपाचं सरकार आहे”, असं या ट्वीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हटलं आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

यापूर्वी आणि आताही भाजपाचं सरकार असताना हे प्रकार होत असल्याचं नमूद करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटातील अभिनेते आणि या मुद्द्यावरून सातत्याने भूमिका मांडणारे अनुपम खेर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “फरक फक्त एवढाच आहे, की अनुपम खेर तेव्हा कलम ३७० काढून टाका म्हणून ओरड करत होते. आज कलम ३७० काढून टाकले आहे. तरीही काश्मीरमधील हिंदूंची तीच अवस्था आहे”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“आज ते शांत का?”

कश्मीर फाईल्स चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का? असा प्रश्न देखील ट्वीटमध्ये विचारण्यात आला आहे. “कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजपा नेते देखील शांत का?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून होत असणाऱ्या हिंदू पंडितांच्या हत्यांच्या घटनांमुळे येथील स्थानिक हिंदू पंडितांच्या कुटुंबियांनी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या खोऱ्यामधून पलायन करण्यास सुरुवात केलीय. गुरुवारी रात्रीच अनेक खासगी वाहनांमधून केंद्र सरकारच्या योजनांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक स्थानिक काश्मिरी पंडितांची कुटुंबं जम्मूच्या दिशेने रवाना झाली. आज पहाटे हे कर्मचारी आणि स्थानिक काश्मिरी पंडीत जम्मूमध्ये दाखल झाले.

परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. अमरनाथ यात्रेआधी काश्मीरमधील हत्यांमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.

Story img Loader