देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला, यावर आता राष्ट्रवादीने व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. तुमच्या घोटाळ्यांची लक्तरं इतकी आहेत की कितीही सारवासारव केली किंवा मोठमोठी आश्वासने दिली तरीही काही उपयोग होणार नाही. बुँदसे गयी वो हौदसे नहीं आती अशी सरकारची परिस्थिती आहे अशी टीका या व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

काय आहे व्यंगचित्रात?
या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना फाटक्या कपड्यांमध्ये दाखवण्यात आले आहे. राफेल, इतर जुमले, सांख्यिकी आयोग यामुळे या दोघांची अवस्था कोणालाही तोंड दाखवण्यासारखी राहिलेली नाही असे दाखवण्यात आले आहे. मग अर्थसंकल्प नावाच्या मोठ्या कापडाने हे दोघेही स्वतःला झाकत आहेत असे दाखवण्यात आले आहे.

एकीकडे भाजपाकडून अर्थसंकल्पावरून भाजपा नेते कौतुक करत असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते या बजेटवर निशाणा साधत आहेत.

Story img Loader