काँग्रेस नेत्या तथा आसाम युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले होते. तसेच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही यावर अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आलेली नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाने आसामाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एक निवेदन जारी करत महिला आयोगाने याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – खळबळजनक! महिला काँग्रेस नेत्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास यांच्यावर छळाचे गंभीर आरोप; म्हणाली, “वरिष्ठांनी…”

महिला आयोगाने नेमकं काय म्हटलंय?

डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही श्रीनिवास यांच्या विरोधात छळाचे गंभीर आरोप केले आहेत. डॉ. अंकिता दत्ता यांनी याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना माहिती दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आसामच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित या घटनेची सखोल निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगाने जारी केलेल्या निवेदनातून देण्यात आली आहे. तसेच याबाबत महिला आयोगदेखील चौकशी करणार असल्याचं या निवेदनातून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – ‘त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, मलिकांच्या दाव्यानंतर पवारांचे टीकास्त्र

नेमकं प्रकरण काय?

आसाम युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. अंकिता दत्ता यांनी बुधवारी ट्वीट करत युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले होते. “मागील सहा महिन्यांपासून युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. आणि सचिव वर्धन यादव माझा छळ करत आहेत. वर्धन यादव यांना महिलेचा सन्मान कसा करायचा हे माहिती नाही. ते मला ‘ये लडकी’ असं म्हणत बोलावतात. ते मला डॉ. अंकिता दत्ता किंवा आसाम युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून संबोधत नाहीत”. असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होते. तसेच “मी याबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली. मात्र, अद्यापही यावर चौकशी समिती नेमण्यात आली नाही.”, अस आरोपही त्यांनी केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncw ask probe after ankita dutta harassment allegation on youth congress chief srinivas bv spb
Show comments